Published On : Thu, Sep 12th, 2019

स्वच्छतेचे गुणांकणासाठी एसएसजी 2019 ह्या एप वर ऑनलाइन प्रतिक्रिया नोंदवा-बीडीओ सचिन सूर्यवंशी

कामठी :-स्वच्छता विषयक गुणांकन ठरविण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2019 अंतर्गत सर्वेक्षण सुरू आहे यासाठी नागरिकांना गुगल प्ले- स्टोअर मधून एसएसजी 2019 हे एप डॉउनलोड करून स्वच्छते बाबत विचारलेल्या चार प्रश्नांची योग्य ती उत्तरे निवडुन ऑनलाइन प्रतिक्रिया नोंदवाव्यात असे आव्हान कामठी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध उपक्रम गावस्तरावर राबविले जातात तसेच स्वच्छतेच्या क्षेत्रात गावाची स्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने ऑनलाइन प्रतिक्रिया जाणून घेतल्या जात आहेत.

यासाठी नागरिकांनी अँड्रॉइड मोबाईल असल्यास गुगल प्ले स्टोअर मधून एस एस जी 2019 हे एप डॉउनलोड करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत तसेच ज्या ग्रामस्थांकडे स्मार्टफोन नसेल त्यांनी आपला प्रतिसाद 18005720112 या टोल फ्री क्रमांकावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत.यानुसार स्वच्छतेबाबत विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे निवडून प्रतिक्रिया नोंदविण्याच्या प्रक्रियेचे गुणांकन करण्यात येणार आहे तरी या सर्वेक्षणात प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी सर्वानी सहभाग नोंदवावा असे आव्हान बीडीओ सचिन सूर्यवंशी यांनी केले आहे.

संदीप कांबळे कामठी