Published On : Sat, Sep 25th, 2021

नामदार यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक!

– पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय व क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी केली जी.प सदस्य दुधिराम सव्वालाखे यांची प्रशंसा

रामटेक – नगरधन येथे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय व क्रीडा युवक कल्याण महा. राज्य मंत्री सुनील केदार, यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत बैठक घेतली.

यावेळी नामदार सुनील केदार यांनी जिल्हा परिषद सदस्य दुधिराम सव्वालाखे यांचा बद्दल प्रशंसा केली त्यांनी म्हंटले की 58 मेंबर मध्ये सगळ्यात अभ्यासू आणि हुषार असेल तर जि.प सदस्य दुधिराम सव्वालाखे जे जिल्हा परीषद ला जी आर येतो तो मग घरकुल चां असो की मग आदिवासी डीपार्टमेंटचां असो की समाजकल्याण चां असो तो जी.आर वाचण्याची व समजण्याची क्षमता असण्याची व त्याचा पाठपुरावा करण्याची योग्यता जर कुणात असेल ते जिप सदस्य सव्वालाखे यांच्यात आहे .

यावेळी नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी च अध्यक्ष राजेंद्र मुळक , जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे , पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, नागपुर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष रमेश बर्वे , जिल्हा परिषद सदस्य दुधिराम सव्वालाखे , कांद्री चे उपसरपंच बबुल बर्वे , सुनील रावत,
नागपूर जिल्हा सहकारी बँक चे माजी संचालक डॉ रामसिंग सहारे ,.कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती लक्ष्मण उमाळे , रामटेक शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष तथा नगर सेवक दामोदर धोपटे , तालूका काँग्रेस कमिटी पारशिवणी चे अध्यक्ष दयाराम भोयर ,

नगरधन चे सरपंच प्रशांत कामडी, उपसरपंच अनिल मुटकुरे , नगरधन-काचूरवाही पंचायत समिती सर्कल अंतर्गत येणाऱ्या गावातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते….