Published On : Sat, Sep 25th, 2021
By Nagpur Today Nagpur News

किरण पेठे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

कामठी :-मराठी भाषेतून प्रसिध्द होणारे, संपूर्णतः जाहिरातमुक्त आणि शिक्षणक्षेत्राला वाहूनं घेतलेले एकमेव डिजिटल शैक्षणिक दैनिक रयतेचा कैवारी दि १६सप्टेंबर२०१९ रोजी सुरू झाले असून नियमितपणे प्रसिध्द होत आहे. राज्यभरासह देशातील कानाकोपऱ्यात हे पोहचले असून यांच्या कार्याचे सगळीकडे कौतुक होत आहे.अश्या दैनिक रयतेचा कैवारी डिजिटल शैक्षणिक वृत्तपत्राचा द्वितीय वर्धापन दीन सोहळ दि.१६ सप्टेंबर २०२१ रोजी १० ते १ या वेळेत मौलाना आझाद संशोधन केंद्र औरंगाबाद येथे साजरा झाला.यावेळी सेठ केसरीमल पोरवाल कॉलेज, कामठी येथील प्रा किरण पेठे,यांना रयतेचा कैवारी डिजिटल शैक्षणिक दैनिक चा मानाचा समजला जाणारा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वरूपात शाल, पुष्पगुच्छ,प्रमाणपत्र, ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमाचे उद्दघटक आणि प्रमुख मार्गदर्शक म. श्री. डॉ. गोविंद नांदेडे (पूर्व शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य),कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री बीबी जाधव( सेवानिवृत्त प्राचार्य एस वी एस एस अध्यापक विद्यालय, उस्मानाबाद ) कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय आ. श्री निलेशजी लंके(विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य ) प्राचार्य डॉक्टर बी ए राजपूत (का गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालय तलासरी) माननीय श्री राजुदास जाधव (कार्याध्यक्ष पतसंस्था फेडरेशन महाराष्ट्र राज्य), माननीय श्री गोपीनाथ जगताप (सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तालुका भूम) माननीय श्री रामदास जी राहणे (संगमनेर जिल्हा अहमदनगर ),माननीय श्री परशुराम राजाराम नरवाडे ,संगीता परिश्रम नरवाडे (पुसद यवतमाळ उपस्थित ) होते.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मराठी भाषेतून दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे डिजिटल शैक्षणिक पाक्षिक रयतेचा कैवारी हे एक शिक्षकांनी शिक्षकांसाठी शिक्षकांकडून चालविलेले पाक्षिक आहे. या पाक्षिकातून प्रामुख्याने शैक्षणिक व प्रेरणादायी असलेले विविध विषयांवरील लेख शालेय व सहशालेय उपक्रम आणि तत्सम साहित्य नियमितपणे प्रकाशित करण्याचा कसोशीने प्रयत्न केला जातो. वृत्तपत्राचे संपादक माननीय शाहू सरांची प्रेरणा व मार्गदर्शन कार्यक्रमांचे उत्कृष्ट नियोजन मान्यवरांची उपस्थिती सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधींची उपस्थिती निवेदकांची उत्कृष्ट शब्द पेरणी मान्यवरांचे मनोगत सर्वांग सुंदर सोहळा पार पडला.

साप्ताहिक रयतेचा कैवारी च्या अंकाचे डिजिटल प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २१ व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सूत्रसंचालन श्रीमती संगीता कापडे मॅडम तर आभार प्रदर्शन अक्षय न्यायाधीश सर यांनी केले. सदर कार्यक्रमाची लाईव्ह प्रक्षेपण रयतेचा कैवारी फेसबुक पेजवर करण्यात आले.

Advertisement
Advertisement