Published On : Thu, Dec 26th, 2024
By Nagpur Today Nagpur News

संविधानात सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नाही तर…;नितीन गडकरींचे विधान

Advertisement

Nitin Gadkari

नागपूर :‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ ‘धर्मनिरपेक्ष’ असा नसून सर्वधर्मसमभाव असा आहे. शब्दकोषामध्येही हाच अर्थ आहे, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

या विधानानंतर राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विवारी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या भाजपच्या विदर्भातील आमदारांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भाजप नागपूर महानगर व जिल्हा यांच्या वतीने क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या मैदानावर बुधवारी हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि आमदार उपस्थित होते.

Gold Rate
Wednesday 15 Jan. 2025
Gold 24 KT 78,400 /-
Gold 22 KT 72,900/-
Silver / Kg 89,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आपल्या देशात ‘सेक्युलर’ शब्दाचा बराच प्रचार केला गेला. मधल्या काळात धर्माधर्मात वाद व्हावे म्हणून राजकीय मतांसाठी ‘सेक्युलर’ शब्दाचा वापर झाला. परंतु, ‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ ‘धर्मनिरपेक्ष’ असा नसून सर्वधर्मसमभाव असा आहे. शब्दकोषामध्येही हाच अर्थ आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. काही देशात युद्ध सुरू आहेत. आज सर्वांना बुद्धाची गरज आहे. जेवढा आदर आम्हाला भगवान श्रीरामांबद्दल आहे तेवढाच भगवान गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त आणि अल्लाहबद्दल आहे, असेही गडकरी म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक –
देवेंद्र फडणवीस हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांचे अभिनंदन करतो. फडणवीसांचे कर्तृत्व हे महाराष्ट्राचे भविष्य बदलणार आहे. त्यामुळे जनतेच्या हिताचे निर्णय घ्या. जात, पंथ, धर्माच्या वर जाऊन राज्याचा विकास करा. राजकारणात अनेक चढ उतार येतात. तुम्हाला इतिहास घडवायचा आहे,असे गडकरी फडणवीसांना म्हणाले.

Advertisement