Published On : Mon, Dec 31st, 2018

पालकमंत्र्याच्या जनता दरबारातील तक्रारींचा महापौरांनी घेतला आढावा

Advertisement

सर्व समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे अधिकाऱ्यांना दिले निर्देश

नागपूर : पालकमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी झोननिहाय जनता दरबार कार्यक्रम हाती घेतला आहे. सोमवारी (ता.३१) महापौर नंदा जिचकार यांनी लकडगंज, आसीनगर व मंगळवारी झोनमध्ये आलेल्या तक्रारींचा आढावा मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात घेतला.

Gold Rate
15 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,900 /-
Gold 22 KT ₹ 1,23,600 /-
Silver/Kg ₹ 1,92,100/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्यासमवेत आयुक्त अभिजित बांगर, उपनेत्या वर्षा ठाकरे, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, लकडगंज झोन सभापती दीपक वाडीभस्मे, आसीनगर झोन सभापती वंदना चांदेकर, मंगळवारी झोन सभापती संगिता गिऱ्हे, नगरसेवक मनोज सांगोळे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजीव जयस्वाल, कार्यकारी अभियंता गिरिश वासनिक, आरोग्यधिकारी डॉ.सुनील कांबळे, पशुचिकित्सक डॉ.गजेंद्र महल्ले, झोन सहायक आयुक्त सर्वश्री गणेश राठोड, सुभाष जयदेव, हरिश राऊत, विजय हुमने, बाजार विभागाचे श्री. उमरेडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, संबंधित झोनचे झोनल अधिकारी, ओसीडब्ल्यूचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी तिन्ही झोनच्या प्रभागनिहाय तक्रारी वाचून दाखवत त्यावर अधिकाऱ्यांनी कोणती कार्यवाही केली याचा आढावा घेतला. मोकळ्या भूखंडावर कचरा साचून आहे, त्या भूखंडधारकांना नोटीस बजावण्यात यावा आणि त्यांच्यावर दंड आकारण्यात यावा, असे निर्देश महापौरांनी दिले. काही भूखंड हे नासुप्रच्या अखत्यारित असल्याने त्याबाबत नासुप्रशी पत्रव्यवहार करावा, असेही महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले. लकडगंज झोनमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यलयातून कचरा जाळण्यात येतो अशी तक्रार होती. यावर कृषी उत्पन्न बाजार समितीला नोटीस बजावण्यात आला आहे.

याशिवाय ५० हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. झोनमधील पथदिवे, रस्ते दुरूस्तीच्या तक्रारींचा आढावा महापौरांनी अधिकाऱ्यांमार्फत घेतला. आसीनगर झोनमधील पिवळी नदीवर संरक्षक भिंत बांधण्याच्या तक्रारीचा आढावा महापौरांनी घेतला. याशिवाय आसीनगर आणि मंगळवारी झोनमधील पथदिवे, अतिक्रम, गडरलाईन समस्या, पिण्याच्या पाण्याचा समस्या, स्वच्छतेसंदर्भातील तक्रारींचा आढावा घेतला. सर्व समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. अधिकाऱ्यांनी प्रभागामध्ये काम करताना स्थानिक नगरसेवकांना कामाची संपूर्ण माहिती देण्यात यावी, अशी सूचनादेखील केली. पट्टे वाटपासंदर्भात झोनमध्ये एक विशेष शिबिर लावण्यात यावे, असे निर्देश देखील महापौरांनी यावेळी बोलताना दिले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement