नागपूर: महापौर नंदा जिचकार यांनी कविवर्य सुरेश भट सभागृहाच्या व्यवस्थेचा आढावा बुधवारी (ता.३) ला सुरेश भट सभागृहात घेतला. आढावा बैठकीला माजी महापौर प्रवीण दटके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त राजेश मोहिते, नितीन कापडणीस, सहायक आयुक्त (साप्रवि) महेश धामेचा, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजीव जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी भट सभागृहातील व्यवस्थेचा आढावा घेतला. तेथील कर्मचाऱ्यांना येणाऱ्यां समस्या जाणून घेतल्या. भट सभागृहातील पार्किंग, बुकींग, सभागृह स्वच्छता, देखभाल दुरूस्ती, विद्युत आणि ध्वनी यासर्वांचा संपूर्ण तयारीनिशी अहवाल आठ दिवसात सादर करण्याचे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले. आठ दिवसात पुन्हा या विषयावर आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ, असेही महापौर यावेळी बोलताना म्हणाल्या.
Advertisement

Advertisement
Advertisement