Published On : Thu, Oct 4th, 2018

महावितरणची आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा बाबा मी तुमचीच मुलगी आहे आणि ओय लेले ने रसिकांची मने जिंकली

Advertisement

नागपूर : महावितरणच्या दोन दिवसीय आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत आज अकोला परिमंडलाचे :बाबा, मी तुमचीच मुलगी आहे’ आणि नागपूर परिमंडलाचे ‘ओय लेले’ ही नाटय प्रयोग सादर करण्यात आली.

अत्यंत बहारदार अभिनय आणि सशक्त कथानक असलेक्ल्या या दोन्ही नाट्यप्रयोगांनी रसिकांची मने जिंकली. याप्रसंगी महावितरणचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे, प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, नाट्यस्पर्धेचे कार्याध्यक्ष तथा नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, अकोलाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे,. चंद्रपूरचे अरवींदभादीकर, अमरावतीच्या सुचित्रा गुजर आणि गोंदियाचे सुखदेव शेरेकर, गुणवत्ता नियंत्रणाचे सुहास रंगारी यांच्यासह महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि नाट्यरसिकांनी या नाटकांचा मनमुराद आनंद घेतला.

Gold Rate
08 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 1,08,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्त्रीभ्रुणहत्ये विरुद्धचा आणि महिला सक्षमीकरणाचा एल्गार असलेले अकोला परिमंडलातर्फ़े ‘बाबा, मी तुमचीच मुलगी आहे’ चा नाट्यप्रयोग आज सकाळच्या सत्रात सादर करण्यात आला. चंद्रकांत शिंदे लिखित आणि नितीन नांदुरकर दिग्दर्शित, डॉ. मुरहरी केळे यांची निर्मिती असलेल्या या नाट्यप्रयोगाने प्रत्येक मुलीच्या पित्याला आपण कन्यारत्नाचे वडील असल्याचा अभिमान वाटेल आणि ज्यांना मुलगी नाही अशां सर्व पित्यांची निश्चितच घालमेल होईल अशी अत्यंत भावस्पर्शी, ह्रदयस्पर्शी, उत्कंठावर्धक, मन हेलावून टाकणारी नाट्यकृती बघतांना नाट्यरसिकांचे डोळे पाणावले होते. गणेश राणे, नुतन दाभाडे, ज्योती मुळे, गणेश बंगाळे, जितेंद्र टप, संतोष पाटील, विलास मानवतकर, पराग गोगटे, अमित इंगळे, स्वाती राठोड, संध्या क-हाळे, ऋषीश्वर बोपडे, अण्णा जाधव, राहुल कुंभारे, संदीप निंबोळकर, योगेश जाढव, पुरुषोत्तम मेहसरे, व शिल्पा डुकरे यांच्या अभिनयाने नाट्य रसिकांना एक सर्वांगसुंदर कलाकृती बघायला मिळाली आहे.
नागपूर परिमंडलाने दिपेश सावंत लिखित, अभय अंजीकर दिग्दर्शित आणि दिलीप घुगल यांची निर्मिती असलेले ‘ओय लेले’ हा नाट्यप्रयोग सादर केला, नाट्यरसिकांना हेलावून सोडणा-या या नाट्यप्रयोगाने ‘ऑनलाईन खरेदी व विक्री’ च्या वेडातून थेट नातेसंबंधाचा व्यवहार आणि त्यातील अगतिकता या विषयाला अभय अंजीकर, स्नेहांजली तुंबडे, अभय नव्हाथे, नम्रता गायकवाड, सुमित खोरगडे, श्रीरंग दहासहस्त्र आणि अविनाश लोखंडे या कलावंतांनी अभिनयाव्दारे कथानकाला योग्य न्याय दिला. आरती कानडे यांचे संगित, नेहा हेमने यांची रंगभूषा, विजय महल्ले यांचे नेपथ्थ्य, प्रितिबाला चौव्हान यांची वेशभूषा आणि सुरज गणवीर यांची प्रकाश योजना कथानक अधिक प्रभावी ठरण्यास यशस्वी ठरली.

Advertisement
Advertisement