Published On : Mon, Jun 14th, 2021

१०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार

जागतिक रक्तदान दिवस

नागपूर : नागपूर महानगरपालिका तर्फे जागतिक रक्तदान दिवसाच्या निमित्ताने महापौर श्री दयाशंकर तिवारी यांनी १०८ वेळा रक्तदान करणारे डॉ बाळकृष्ण महाजन यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि मनपा चा दुपट्टा देऊन सोमवार (१४ जून) रोजी महापौर कक्षात सत्कार केला. या वेळी गांधीबाग झोन च्या सभापती श्रीमती श्रद्धा पाठक, सामाजिक कार्यकर्ता बृजभूषण शुक्ल उपस्थित होते.

महापौरांनी डॉ महाजन यांच्या कार्याचा गौरव केला आणि विश्वास व्यक्त केला कि युवा त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेतील. डॉ महाजन यांनी पहिल्यांदा सन १९७८ मध्ये एक एन सी सी कॅडेट च्या प्राणाची रक्षा करण्यासाठी रक्तदान केले होते.

त्यानंतर त्यांनी रक्तदानाचा आपला प्रयत्न सुरु ठेवला आणि दिल्ली, मुंबई, पुणे आणि नाशिक मध्ये हि त्यांनी रक्तदान केले. त्यांनी युवकांना आग्रह केला आहे कि त्यांनी रक्तदानासाठी समोर या आणि नागरिकांचा जीवाचे रक्षण करा. आपला वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा कोणतयाही दिवशी रक्तदान करता येतो.