नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग, महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून अल्प आय वर्गातील गरीब, गरजू, विधवा, परितक्यता महिलांना प्रत्येकी रु ११,५००/- प्रमाणे ३२ महिलांना शिवणयंत्र खरीदीसाठी रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली.
महापौर श्री. दयाशंकर तिवारी आणि महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना रु ३,६७,०००/- चे चेक वाटप करण्यात आले. महापौरांनी आशा बाळगली की महिला या रक्कमेतून शिवण यंत्र खरीदी करुन आत्मनिर्भर होतील. यावेळी लकडगंज झोन सभापती श्रीमती मनीषा अतकरे उपस्थित होत्या.
Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement