Published On : Fri, May 14th, 2021

शुक्रवारी ३४ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. १४ मे) रोजी ३४ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २,२५,००० चा दंड वसूल केला.

गांधीबाग झोन अंतर्गत मोमीनपुरा येथील लिडर्स स्टोअर्स, शादीज डेअरी व हैद्राबाद चिकन या सर्व दुकानांना गांधीबाग झोनच्या सहाय्यक आयुक्तांच्या आदेशाने सील करण्यात आले. तसेच मंगलवारी झोन अंतर्गत बैहरामजी टाऊन येथील सीडीऐ सेंटर कोचिंग सेंटर ला मंगळवारी झोनच्या सहाय्यक आयुक्तांच्या आदेशाने सील करण्यात आले.

Gold Rate
Apr 06,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,49,000 /-
Gold 22 KT ₹ 1,38,600 /-
Silver/Kg ₹ 2,34,500/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पथकाने ६२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement