कामठी :-इराकच्या करबला येथे हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या 72 साथीदाराच्या त्याग आणि बलिदानाच्या समूर्तीनिमित्त मोहरम ला कामठीच्या हुसैनाबाद हैदरी इमामवाड्यातून ताबूत जुलूस काढन्यात आला .
मोहरम कार्यक्रमानिमित्त सकाळी आमाले अशुरा सादर करण्यात आला नंतर हैदरी इमामवाड्यात मजलिस (प्रवचन )झाले यात मौलाना सय्यद शमशाद हुसेन जाफरी यांनी करबल्याच्या घटनेवर प्रवचन दिले त्यानंतर ताबुताची मिरवणूक काढण्यात आली ती जुनी कामठी पोलीस स्टेशन जवळ पोहोचून तेथे साखळ्यानी मातम करण्यात आला.
तांबुताचा जुलूस भाजी मंडी, कॅन्टोन्मेंट या मार्गाने गाडेघाट या करबला नदी निघाली यानिमित्त नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तसेच डीसीपी निलोत्पल , एसीपी राजेश परदेसी यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांच्या नेतृत्वात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
संदीप कांबळे कामठी

