Advertisement
नवी दिल्ली :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे.सर्वच जण या निवडणुकींच्या तारखांची आतुरतेने वाट बघत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्याच जाहीर होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने दिली.
2024 च्या लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्रकार परिषद थेट प्रक्षेपित केले जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार दुर्मिळ तिसरी टर्म जिंकण्याची आशा करत आहे, तर विरोधक इंडिया आघाडीच्या अंतर्गत एनडीएमध्ये धक्का देण्याची आशा करत आहेत. दरम्यान, आदर्श आचारसंहिता निवडणूक घोषणा झाल्यानंतर लगेच लागू होणार आहे.