बंगलौर -कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते बीएस येडीयुराप्पा यांच्याविरोधात एका १७ वर्षांच्या मुलीवर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांनी येडीयुराप्पा यांच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
माहितीनुसार, २ फेब्रुवारी रोजी येडीयुराप्पा यांच्याकडे फसवणुकीच्या एका प्रकरणात एक महिला आणि तिची १७ वर्षांची मुलगी मदत मागण्यासाठी आली होती. यावेळी येडीयुराप्पा यांनी या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
येडीयुराप्पा यांच्याविरोधात बंगळुरुच्या सदाशिवनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळीच हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी माजी मुख्यमंत्र्यांविरुद्ध पोक्सो (लैंगिक अत्याचार) कलम 8 आणि कलम 354 ए (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल केला.येडीयुराप्पांवर गुन्हा दाखल होताच कर्नाटकातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दरम्यान या गंभीर आरोपसंदर्भात बीएस येडियुरप्पा यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले.या महिलेने आजपर्यंत दाखल केलेल्या 53 प्रकरणांची यादी जारी केली आहे. येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने तक्रारदार महिलेला अशा तक्रारी दाखल करण्याची सवय असल्याचे सांगण्यात आले आहे.