Published On : Fri, Apr 24th, 2020

अधिकाऱ्यांनाहि फुटला माणुसकीचा पाझर

कामठी : सर्वत्र लाँकडाउन असल्याने श्रमजीवी कामगार हातमजुर कोणत्याना कोणत्या कामा- निमित्त परप्रांतांतुन पोट भरण्यास आलेला गरजुवर्ग जिथे आहे तिथेच थांबलेला आहे. प्रशासन आपले प्रजेची अत्यावश्यक ती काळजी घेत आहे.काही मजुर पायपिट करीत आपपाल्या गावाकडे निघालेत मात्र ज्यांच्याकडे लहान मुले आहेत वा वयस्क आहेत किंवा जे शासनाचे दिशानिर्दशानुसार आहेत तिथे थांबलेले आहेत त्यांची काळजीशासन आपल्या स्तरावर घेतच आहे विश्व महामारीच्या या संकटात भारत मागे असला तरी आपली लोकसंख्या व अशिक्षीत असलेल्या लोकांपेक्षाही एक हेकेखोर वर्ग व गलिश्च राजकारण करणारा संधीची वाट पाहात वाईटातहि आपले हित कसे साध्य होइल य़ाची संधी शोधणारा वर्ग कमी नाही,तर या परिस्थितीत समस्त मानव जातीला या संकटातुन सही सलामत वाचविण्याच्या या कार्यात प्रशासनाची दारोमदार आरोग्य रक्षणाची जबाबदारी डाँक्टर्स,नर्स,व त्यांचे सहकारी प्राणाची बाजी लावुन परिश्रम घेतात आहेत,कायदा सुव्यवस्था पोलीस खाते रस्त्यावर उतरुन बंदोबस्त अहोरात्र सांभाळत आहेत.साफसफाई निर्जतुंकीकरण याची जबाबदारी सफाई कर्मचारी य़ुध्दस्तरावर सुरु असतांना शासनाची जीवनावश्यक सेवा अन्नधान्य पुरवठा व विविध उपाय गरजुंपर्यंत पोहचविण्याकरिता शासनस्तरावर अधिकारी वर्ग नेटाने व अधिक परिश्रमाने कार्यरत आहेत सामाजीक संस्था,मानवता जपणारी मंडळी आपल्या कडुन या संकटात मदतीचा हात पुढे करुन गरजुं पर्यंत पोहचत आहेत.

अश्या या राष्ट्र संकटसमयी स्वस्थ बसेल तो कर्तव्यदक्ष अधिकारी कसला.असेच कर्तव्यदक्ष कामठी तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांना तालुक्यातील गरजु व पोट भरण्यास कामानिमित्त बाहेर गावची आलेली मोल मजुरी करणारी मंडळी यावेळेस कठीण परिस्थितीत असल्याची माहिती मिळताच त्यांनी आपले स्तरावर आपले सर्व सहकारी यांना घेवुन त्यांना मदत करण्याचा चंग बांधला व त्यांच्या या प्रयत्नाने अश्या गरजवंतास तांदुळ,गहु, तेल,तिखट,हळद,इत्यादि. साहित्याची पँकेटस् तयार करुन आापले ग्रामसेवक,समाजसेवक यांचे हस्ते पोहचते केले.गरजुंच्या हातात हि मदत पोहचताच बिकट परिस्थितीत मलीन झालेल्या त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडुन ऊसळला हे सांगायला नकोच,आणि सहाजीकच देण्याऱ्यांसमोर त्यांच्या ह्रदयातुन शब्द निघाले ईश्वर आपणांस खुप प्रगती देवो. त्यांना काय माहिती की यामागे कर्तव्यदक्ष अधिकारी सचीन सुर्यवंशी यांचे संवेदनशिलतेनेे पडद्या आड राहुन केलेले हे समयसुतकतेचे कार्य आहे.

संदीप कांबळे कामठी