Published On : Fri, Apr 24th, 2020

कोरोना पार्श्वभूमीवर 91 रक्तदात्यांनी केलं रक्तदान

गृहमंत्री अनिल देशमुखांची शीबिराला भेट

काटाेल : कोरोना विषाणूंमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी व कुठेही रक्ताची कमी पडु नये त्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते त्यानुसार पंचायत समिती काटोल च्या वतीने रक्तदान शिबिराचे शुक्रवार ला आयोजन केले होते या रक्तदान शिबिराला 91 रक्तदात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला

रोज शुक्रवारला सकाळी अकरा वाजता राहुल देशमुख यांचे हस्ते शिबिराचे उदघाटन करून रक्तदानाला सुरुवात करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर कोल्हे,समीर उमप,प.समिती सभापती धम्मपाल खोब्रागडे, उपसभापती अनुराधा खराडे,सर्व प.स.सदस्य,माजी उपसभापती अनुप खराडे,संदीप वंजारी, डॉ.अनिल ठाकरे,शिवाजी देव्हारे,एम एस ए बीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र मळसने, अयुब पठाण, पंकज मानकर,मुन्ना पटेल आदी उपस्थित होते.


राज्यातील व देशातील कोरोना विषाणूंचा होत असलेला प्रादुर्भाव बघता या शिबिरात रक्तदान करण्यासाठी येणाऱ्या रक्तदात्यांनी सुरक्षित अंतर राखून रक्तदान केले. सकाळी अकरा वाजता सुरुवात करून दुपारी 4 वाजेपर्यंत चालणाऱ्या या रक्तदान शिबीरात 91 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

रक्तदान शिबीर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र डोमके,डॉ.शशांक व्यवहारे,डॉ.सुधीर वाघमारे,डॉ.पराग नांदगावकर यांच्या मार्गदर्शना मदर ब्लड बँक च्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थित पार पडले.आयोजनकरिता गट विकास अधिकारी सुनील साने,शिक्षणाधिकारी दिनेश धवड,स.गट विकास अधिकारी विजय धापके तसेच सर्व पंचायत समिती पदाधिकारी व अधिकारी यांनी परिश्रम घेतले.

[ फोटो गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पंचायत समिती काटोल येथे सुरू असलेल्या रक्तदान शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह द्विगुणित केला