Published On : Fri, Apr 24th, 2020

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 11 लाख रुपयांचा धनादेश

नागपूर : हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट मोठा ताजबाग, नागपूर यांच्याकडून 11 लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.

यावेळी हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट मोठा ताजबागचे प्रशासक जी. एम. कुबडे, कार्यकारी सदस्य अमानउल्लाह खान, सामाजिक कार्यकर्ते सलीम खान, बुरझीन रंडोलिया उपस्थित होते.