Published On : Wed, Mar 6th, 2019

विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन बुधवारी

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी होणा-या विकास कामांचे बुधवारी (ता.६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील.

बुधवारी (ता.६) दुपारी १२.१५ वाजता मच्छीसाथ तीन नल चौक मटन मार्केटचे लोकार्पण, दुपारी १२.४५ वाजता गीतांजली चौक ते गांधीसागर मार्ग डी.पी. रोडचे रजवाडा पॅलेससमोर भूमिपूजन, सायंकाळी ५.३० वाजता संविधान चौक येथे संविधान उद्देशिका शिलालेख कार्याचे भूमिपूजन करण्यात येईल. यानंतर सायंकाळी ६ वाजता फुटाळा तलाव परिसरात मुख्य कार्यक्रम होईल ज्यात ४२ मे.वॅट सोलर प्रकल्पाचे भूमिपूजन, शहरातील पथदिवे एलईडीमध्ये परिवर्तीत करण्याच्या कार्याचा शुभारंभ, त्रिमूर्तीनगर येथील उद्यानाचे लोकार्पण, त्रिमूर्तीनगर येथील अत्याधुनिक अग्निशमन केंद्राचे आणि कर्मचारी वसाहतीचे लोकार्पण होईल.

Advertisement

मुख्य कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार नागो गाणार, आमदार प्रकाश गजभिये, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, पश्चीम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलींद माने, दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेता संदीप जोशी, विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, बसपा पक्षनेते मोहम्मद जमाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनेते दुनेश्वर पेठे, शिवसेना पक्षनेते किशोर कुमेरिया, सतरंजीपुरा झोन सभापती यशश्री नंदनवार, गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, नगरसेविका शकुंतला पारवे, नगरसेवक रमेश पुणेकर, कमलेश चौधरी, अमर बागडे, ॲड. संजयकुमार बालपांडे, नगरसेविका सरला नायक, शिल्पा धोटे, रूतिका मसराम, डॉ. परिणिता फुके, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे उपस्थित राहतील.

Advertisement
Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement