Published On : Wed, Mar 6th, 2019

पोकलेनसह विविध यंत्रसामुग्रीचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

नागपूर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे व आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांच्या प्रयत्नातून खरेदी करण्यात आलेल्या पोकलेनसह विविध यंत्रसामुग्रीचे महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन परिसरात या यंत्रसामुग्रीचे लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी महापौर नंदा जिचकार यांच्यासह उपमहापौर दीपराज पार्डीकर, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, अग्निशमन विशेष समिती सभापती लहुकुमार बेहते, ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, प्रतोद दिव्या धुरडे, आरोग्य समिती उपसभापती विजय चुटेले, सदस्य लखन येरवार, दिनेश यादव, विशाखा बांते, वंदना चांदेकर, नगरसेविका वर्षा ठाकरे, विरंका भिवगडे, मंगला लांजेवार, वैशाली नारनवरे, शिल्पा धोटे, वंदना भगत, नगरसेवक निशांत गांधी, राजेंद्र सोनकुसरे, जुल्फेकार अहमद भुट्टो, सहायक आयुक्त प्रकाश वराडे उपस्थित होते.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरात सेवा देण्यासाठी आवश्यक निधीसाठी राज्य शासनाकडून ४.५ कोटी रुपये निधी प्रदान करण्यात आला. या निधीमधून दोन पोकलेनसह सहा बॅक हो लोडर, सात टिप्पर, तीन स्कीड स्टिअर (रोबोट) व एक डोझर आदी यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आली आहे. सदर यंत्रांमुळे शहरातील आरोग्यविषयक कार्यामध्ये मदत होईल, असा विश्वास यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.