
ही घटना इसासनी माधवनगरी येथील दर्ग्याजवळ उघडकीस आली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत युवकाची ओळख अंकुश किशोर शेंडे (वय 32, रा. पंचशील नगर, इसासनी) अशी करण्यात आली आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, अंकुशला सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास परिसरात फिरताना पाहण्यात आले होते. मात्र रात्री सुमारे 8 वाजता काही नागरिकांना दर्ग्याजवळ रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात युवकाच्या डोक्यावर दगडाने वार केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झाले नसून एमआयडीसी पोलिस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
अपराधियों की खैर नहीं! गैंग और बदमाशों की बनेगी पूरी ‘कुंडली’ #NagpurNews...
गोंदिया के देवरी में ईद-ए-मिलाद का जश्न! निकली भव्य रैली #EidMilad #EidMiladUnNabi...
मुंबई आंदोलन से पहले रविकांत तुपकर को पुलिस का नोटिस! #RavikantTupkar #KisanAndolan...
शादी का झांसा, बार-बार संबंध और फिर इनकार! #NagpurNews #Sitabuldi #CrimeNews #MaharashtraNews




