Published On : Fri, Sep 8th, 2023
By Nagpur Today Nagpur News

धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटला ; राधाकृष्ण विखे पाटलांवर भंडारा उधळून जाहीर निषेध !

Advertisement

सोलापूर : राज्यात सध्या ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणावरून मोठा वाद पेटला आहे. तर आता दुसरीकडे धनगर आरक्षणाचा मुद्दाही पेटला आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर दौऱ्यावर असताना धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी कृती समितीच्या सदस्यांनी त्यांच्यावर भंडारा टाकून निषेध केला. यानंतर शासकीय विश्रामगृहात मोठा गोंधळ उडाला. यानंतर विखे पाटलांच्या अंगरक्षकांनी त्या तरुणाची लगेच धरपकड करून त्याला चोप दिला.

माहितीनुसार, बंगाळे नामक धनगर आरक्षण कृती समितीचा पदाधिकारी एक निवेदन घेऊन तिथे दाखल झाला. राधाकृष्ण विखे पाटील यांना त्याने निवेदनही दिले. मात्र, विखे पाटील हे निवेदन वाचत असताना त्याने खिशातून एक पुडी काढून त्यातला भंडारा विखे पाटलांच्या डोक्यावर ओतला.त्यानंतर एकाच गोंधळ उडाला.

धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने घटनादत्त एसटी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरीत करावी व ओबीसी आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धक्का लावू नये यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे”, अशी प्रतिक्रिया बंगाळेने प्रसार माध्यमांना दिली.धनगर आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर झाली नाही, तर येणाऱ्या काळात मुख्यमंत्री, मंत्र्यांना काळं फासायलाही धनगर समाज मागे-पुढे बघणार नाही,असा इशाराही बंगाळेने दिला आहे.