Published On : Fri, Feb 14th, 2020

आमदार टेकचंद सावरकर च्या आढावा बैठकीत गाजला पंतप्रधान आवास योजनेसह 22 बौद्ध विहार बांधकामाचा चा मुद्दा

Advertisement

कामठी :-कामठी-मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कामठी नगर परिषद ला प्राप्त शासकीय निधीची झालेली विल्हेवाट, झालेली विकासकामे , कामांची गुणवत्ता , प्रलंबित कामे आदींचा आढावा घेण्याच्या उद्देशाने आज 14 जानेवारीला कामठी नगर परोषद सभागृहात आमदार टेकचंद सावरकर यांची आढावा सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत पंतप्रधान आवास योजना चा मुद्दा चांगलाच गाजला असून योजना सुरू होऊन तीन वर्षे लोटून गेले मात्र उद्दिष्टपूर्ती होण्याच्या मार्गावर नसून कित्येक लाभार्थी अजूनही वंचित असल्याने या कामाला लवकरात लवकर गती देत ‘सर्वासाठी घरे 2022 ‘या संकल्पनेच्या यशस्वीतेसाठी कामाला गती देण्याचे आव्हान केले तसेच दलित वस्ती विकास सुधार योजने अंतर्गत कामठी शहरात बांधण्यात येणाऱ्या 22 बौद्ध विहारापैकीं बोटावर मोजणारे चार बुद्ध विहार बांधण्यात येत असून 5 कोटी चा निधी हा धूळखात पडला असल्याने या कामाला लवकरात लवकर गती देण्यात यावी .असे आव्हान आमदार टेकचंद सावरकर यांनी केले.या आढावा बैठकीचा शुभारंभ पुलवामा हत्याकांडातील शहिदाना अभिवादन वाहून करण्यात आले .

Advertisement

या आढावा बैठकीला उपमुख्य अधिकारी नितीन चव्हाण, नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत, , माजी उपाध्यक्ष अब्दुल मतींन खान, विरोधी पक्ष नेता लालसिंग यादव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी आमदार टेकचंद सावरकर यांनी प्रधानमंत्री आवास योजना मंजूर डीपीआर प्रगती, प्रधानमंत्री आवास योजना पट्टे वाटप, कामठी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत चालु असणारी विविध कामे व त्यांची प्रगती, कामठी शहरातील विविध कामावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पीएमसी म्हणून काम करीत आहे त्या कामाचा आढावा, शहरकरिता मंजूर निधी व प्रस्तावित निधी यामधून करावयाची कामांचा आढावा, कामठी नगर परिषद करिता जागा मागणी करिता पाठविलेल्या प्रस्तावाचा आढावा, शहरातील विविध योजनांची अंमलबजावणी करीत असताना येणाऱ्या अडचणी , कामठी शहरातील घनकचऱ्याची जागेची समस्या, विकास आराखडा सध्यस्थीतीचा आढावा आदी विषयावर आढावा घेत उपरोक्त विषयातील नाले सफाई , आवास योजना चे पट्टे वाटप, पिण्याच्या पाण्याची वितरण व्यवस्था आदींबाबत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर घेतले .यासह आदी विषयावर गांभीर्याने आदेशीत केले. तसेच उन्हाळ्याची जाणीव लक्षात घेत 27 कोटी रुपयांची मंजूर पाणी पुरवठा योजनेला लवकरात लवकर गती देत शहराला 24 तास पाणी देता येईल याबाबत सविस्तर चर्चा केले तसेच उपस्थित समस्त नगरसेवकांचे विकासकामा संदर्भात गऱ्हाणे ऐकत मौलिक असे मार्गदर्शन केले.

याप्रसंगी नगरसेवक प्रतीक पडोळे, नगरसेविका संध्या रायबोले, नगरसेविका सुषमा सिलाम, रमा गजभिये, स्नेहलता गजभिये, वैशाली मानवटकर , लालसिंह यादव, संजू कनोजिया, अहफाज अहमद, राजू पोलकमवार, ममता कांबळे,आरिफ कुरेशी, सुभाष मंगतानी, रमेश दुबे आदी नगरसेवक गण प्रामुख्याने उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी