Published On : Fri, Feb 14th, 2020

कुछ तो नया है…….!

तरुणाई आणि नागरिकांसाठी महापौरांचा अफलातून उपक्रम :

१७ फेब्रुवारीला होणार घोषणा

Advertisement

नागपूर : कुछ तो नया है….! या शब्दाची धूम आता वर्षभर राहणार आहे. कारण प्रत्येक वेळी नवे काही तरी करण्याचा ध्यास घेतलेले महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून पुन्हा काही तरी नवीन जन्माला येतेय….ही संकल्पनाच अफलातून राहणार आहे. काही तरी नवे, काही तरी चांगले अशी ही संकल्पना असून तरुणाई आणि नागरिकांसाठी औत्सुक्याचा विषय ठरणार आहे…..काय आहे हे नवे हे जाणून घेण्यासाठी सोमवार १७ फेब्रुवारीपर्यंत वाट बघावी लागणार आहे……

शहरातील अंबाझरीनजिक असलेल्या विवेकानंद स्मारक येथे काही तरी नवे साकारले जात आहे. यामधील शब्द जरी सर्वांना चिरपरिचित असले आणि त्याचा अर्थबोधही सर्वांना होत असला तरी त्यामागे सामाजिक हेतू दडला आहे. यामाध्यमातून एक नवी चळवळ सुरू होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.

यासाठी शहरातील काही तरुणाई एकत्र आली आहे. या तरुणाईच्या सहकार्याने महापौर संदीप जोशी नवी घोषणा विवेकानंद स्मारकावर १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता करणार आहे. ती घोषणा काय असेल हा मात्र औत्सुक्याचा विषय आहे.

महापौर संदीप जोशी यांनी २२ नोव्हेंबर रोजी महापौरपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर सतत काहीतरी नवे करण्यासाठी नवे संकल्प मांडत आहे. नागरिकांचा सहभाग असल्याशिवाय शहराचा विकास शक्य नाही, हे जाणत त्यांनी ‘वॉक ॲण्ड टॉक विथ मेयर’, ‘ब्रेकफास्ट विथ मेयर’, शहरस्तरावरचे ‘तक्रार निवारण शिबीर’, झोनस्तरावरचे ‘जनता दरबार’, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोठ्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी ‘मम्मी पापा यू टू’ अभियान आदी उपक्रम हिट ठरलेत.

या सर्व अभियानापेक्षाही वेगळे आणि अफलातून उपक्रम घेऊन आता स्वत: महापौर संदीप जोशी येणार आहेत. या दरम्यान विवेकानंद स्मारकाला शहरातील नागरिकांनी भेट द्यावी, जे काही तेथे नवे दिसेल त्यासंदर्भात आपल्याला काय वाटते, त्यामागे काय असू शकते, महापौरांची संकल्पना काय असू शकते, हे सुद्धा आपण सांगू शकता. कारण या उपक्रमात नागरिकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. जर आपण विवेकानंद स्मारकाला भेट दिली असाल आणि नवे काही तरी बघितले असाल तर तातडीने आपला फोन उचला, ‘हॅलो महापौर’ हे ॲप डाऊनलोड करा.

ॲपवरील वॉटस्‌ॲपच्या बटन वर ‘क्लिक’ केले तर आपण सरळ महापौरांच्या वॉटस्‌ॲप क्रमांकाला कनेक्ट व्हॉल. तक्रारी आपण त्यावर पाठवताच, परंतु आता आपण महापौरांची ही संकल्पना काय असू शकते, त्याबाबतही महापौरांना ॲपच्या माध्यमातून वॉटस्‌ ॲपवर कळवू शकता. तर मग उचला आपला स्मार्ट फोन…डाऊनलोड करा HELLO MAHAPAUR ॲप आणि पाठवा महापौरांच्या मनातील ‘ती’ संकल्पना काय असू शकते.

आपण पाठविलेली संकल्पना तीच आहे की नवे काहीतरी आहे, हे जाणून घेण्यासाठी १७ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता विवेकानंद स्मारक येथे तरुणाई आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement