Published On : Fri, Dec 22nd, 2017

गोंडी दिग्रस ते मराठी चित्रपटसृष्टी

Bunty Mendake
नागपूर/अकोला:
चित्रपट सृष्टीची भुरड प्रत्येकालाच आहे चित्रपट सृष्टीत काम कराव असे प्रत्येकाचे स्वप्न असते परंतु ते पूर्णत्वास जाईलच असे घडत नाही परंतु गोंडी दिग्रस येथे जन्मलेल्या अत्यंत सामान्य कुटूंबातील बंटी मेंडके या युवकाने हे स्वप्न प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर साकार करत मराठी चित्रपटात नुकतंच पदार्पण केलंय.

आंतरराष्ट्रीय स्थरावरील मॉडेल म्हणून नावारूपाला आलेल्या बंटी मेंडके यांना प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक शरद गोरे,पटकथा लेखक रवींद्र जवादे यांच्या आगामी “प्रेमरंग” चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी निवडण्यात आले असून मराठी चित्रपट सृष्टितील मातब्बर कलाकार असणाऱ्या ‘प्रेमरंग” या कलाकृतीत बंटी मेंडके यांची प्रमुख भूमिका असणार आहे.

सावरगांव रोडवर असलेल्यां गोंडी दिग्रस सारख्या १५०० लोकवस्तीच्या लहानश्या गावात बंटी मेंडके याचा जन्म झालेला असून त्याने आपले प्राथमिक शिक्षण वामरावजी मानकर हायस्कूल खामली मधून माध्यमिक शिक्षण बनारसीदास रुहिया विद्यालय येथून तर अभियांत्रिकीचे शिक्षण जे डी महाविद्यालयातून पूर्ण केले आहे.

Advertisement

कायम धडपड करून आपल्या गावाचे कुटुंबाचे नाव जगभरात पोहचावे हा निर्धार करणाऱ्या बंटी मेंडके याने आजवर अनेक आंतरराष्ट्रीय स्थरावरील मॉडेल सोबत विविध स्पर्धा गाजवलेल्या असून अनेक जाहिरातीतून आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे २५ वर्ष्याच्या या तरुणाचा उत्साह व स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरू असणारी धडपड खरच प्रेरणादायी आहे

बंटी मेंडके हे बाझगी इंटरनॅशनल संस्थेचे संचालक असून आपल्या संस्थेमार्फत त्याने आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबविलले आहेत

गोंडी दिग्रस सारख्या छोट्याश्या गावात जन्म घेऊन आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या कलेच्या माध्यमातून बंटी मेंडके याने मिळवलेले यश प्रत्येक तरुणांना दिशा देत प्रेरणादायी शिकवण देणारे ठरेल हीच अपेक्षा.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement