Published On : Wed, Dec 5th, 2018

वेकोलिच्या ११०० के व्ही चा शॉक लागुन मजुर गंभीर जखमी

लोकांच्या सतर्कतेने दुसऱ्यांदा मोठय़ा अनर्थ ठळला.शॉकने मजुर गंभीर जखमी

नागपुर: राष्ट्रीय महामार्गाने गेलेल्या वेकोलि कोळशा खदान च्या ११००के व्ही विधृत ताराचा शॉक लागुन नविन विधृत खांबावर कामकरणा-या खाजगी कंत्राटदारांचा मजुर रोशन बागडे गंभीर जखमी झालाने नागपूर ला उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे .

नागपूर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील कन्हान शहरातील विजय मॉर्केट डोणेकर सभागृहाजवळ भुमिगत विधृत लाईनचे काम मागील तीन महिन्या पासुन सुरू आहे .मंगळवार (दि.४) ला ४.१५ वाजता दरम्यान भुमिगत विधृत तार नविन विधृत खांबावर जोडणी करिता चढलेल्या खाजगी कंत्राटदारांचा मजुर रोशन तुळशीराम बागडे वय ३४ वर्ष रा सिहोरा यास लागुनच गेलेल्या वेकोलि कोळशा खदानच्या ११०० के व्ही विधृत ताराचा हाताला शॉक लागल्याने तो मृर्छित अवस्थेत लटकुन होता.

आजुबाजुच्या लोकांनी सतर्कतेचा परिचय देत विधृत अधिकारी ला फोन करून प्रवाह बंद केला व सोबत काम करणाऱ्या महेंद्र शामराव मेश्राम (३५), राकेश पुंडलिक हावरे (३०), पंकज सिताराम बागडे (३०), दिलीप गोंविदराव बावने (४४) सर्व रा सिहोरा कन्हान या मजुरांनी त्यास हिमतीने खाली उतरवुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान ला नेण्यात आले . रोशन बागडे चा उजवा हात व छातीचा भाग मोठय़ा प्रमाणात भाजल्याने नागपूर ला रवाना केले .मानकापुर नागपूर येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे .

महामार्ग लगत नविन भुमिगत विधृत लाईनचे मागील तीन चार महिन्या पासुन खाजगी कंत्राटदार मंदगतीने काम करित आहे. धोकादायक काम असल्यास सबंधित विधृत विभागाची परवानगी घेऊन विधृत प्रवाह बंद करून काम करीत होते परंतु आज कंत्राटदारांने कुठलीही परवानगी न घेता वेकोलिच्या ११०० के व्ही विधृत प्रवाह बंद न करता काम करीत असल्याने विधृत शॉकची दुर्देवी घटना घडल्या चे कन्हान शहर विधृत अभियंता ओंकार यांनी सांगितले
याच ठिकाणी ७ ऑक्टोबर ला पिपळाचे झाड कंत्राटदारांचे मजुर तोडताना झाडाचा फांद्या याच वेकोलि च्या ११०० के व्ही च्या तारावर पडुन फांद्या जळत होता तेव्हा सुध्दा विधृत प्रवाह बंद करण्यात आला नव्हता परंतु लोकांच्या सतर्कतेने मोठय़ा अनर्थ टळला होता . ही बातमी देशौन्नती ला ८ ऑक्टोबर २०१८ ला प्रकाशित करण्यात आली होती .