कामठी :-कामठी तालुक्यात फेब्रुवारी महिन्यापासून आलेल्या कोरोणाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजवत तालुक्यात मृत्यूचे तांडव पसरले आहे त्यातच रुग्णसंख्या वाढीवर असून रुग्णालयात वेळेवर बेड न मिळणे, ऑक्सिजन न मिळणे, रेमडीसीवर इंजेक्शन न मिळणे या सर्व बाबी दैनंदिन त्रासदायक झालेल्या आहेत परिणामी बहुधा रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होऊन मृत्युमुखी पडत आहेत तर कित्येक रुग्ण हे कोरोनाच्या दहशतीनेच दगावत आहेत.अशा स्थितीत कामठी तालुक्यातील माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका सामाजिक संस्थेला एमबुलेन्स दिले तसेच नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांनो लोकसेवेसाठी स्वतःच्या खर्चातून एक रुग्णवाहिका सेवेत कार्यरत ठेवून माणुसकीची भूमिका साकारत आहेत मात्र इतर लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेताना दिसत असून राजकारणात निवडणुकीत आपला प्रतिनिधी निवडून यावा यासाठी कत्तल च्या रात्री अवैधरित्या लाखो रुपयाची उधळण केली जाते मात्र आजच्या वर्तमान बिकट स्थितीत लोक नाईलाजास्तव मरत आहेत ही वास्तुस्थिती डोळ्यासमोर येऊनही काही कोलप्रतिनिधी घरात दडले आहेत त्यांनी हीच निवडणूक गृहीत धरून आपला मतदार मरणार नाही याची जाणीव घेत मदतीचे हात पुढे करून खऱ्या लोकप्रतिनिधो ची भूमिका साकारावी असे मत जागरूक नागरीकानी मांडले आहे.
संवेदनशीलता हा मनुष्य प्राण्याचा उपजत गुण असतो असे म्हणतात. माणसाच्या याच संवेदनशीलतेचा प्रत्यय मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत आला होता.जेव्हा गोरगरीब जनतेला लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या बाहेर राज्यातील जनतेला कामठी तालुक्यातील दानशूर व्यकत्तींनी, समाजसेवी संघटनांनी, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात पुढे करत जीवणावश्यक वस्तूंचे वाटप केले होते परंतु यावर्षी मात्र मदत करणारे हातच गायब झाल्याचे चित्र कामठी तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
कोरोनाचा वाढता प्रकोप व अचानक लागलेल्या लॉकडॉउन मुळे मागील वर्षी कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला दोन वेळच्या जेवणाची आंत पडली होतो. घरी रेशन पाणी नाही, आणि बाहेर रोजगार नाही अशा परिस्थितीत अडकलेल्या मजूर, ज्येष्ठ नागरिक, विधवा किंवा परितक्त्या स्त्रिया वगोरगरिबांना काही संवेदनशील नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी , सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात पुढे करून अन्नधान्य व दैनंदिन गरजेच्या वस्तूचे वाटप केले होते.काही दानशूर व्यक्तींनी तर आपण मदत गुप्त ठेवून त्याबद्दल कुठलीही प्रसोद्धी होऊ न देता वाटप केले होते .
कोणीही उपाशी राहू नये यासाठी मागील वर्षी सर्वजण प्रयत्न करीत होते .सर्व जातोधर्माच्या लोकांनी एकत्र येत एकमेकाला सहायय करणे हाच खरा धर्म असल्याचा प्रत्यय करून दिला होता. मात्र यावर्षी मदतीचे हे हात कुठे गेले असा प्रश्न पडला आहे कारण राज्य शासनाने या एप्रिल महिन्यात लावलेल्या कडक निर्बंधांमुळे सकाळी 11 नंतर तालुक्यात शुकशुकाट पसरल्याने मजूर वर्ग, खेडयापाड्यातील कामगार, विविध दुकानांमध्ये काम करणारे कामगार यांच्या दोन वेळचा आटापिटा झाला आहे तसेच बाजारपेठ बंद असल्यामुळे भिक्षा मागणाऱ्या भिक्षेकरूंचा सुदधा उपासमार सुरू आहे तसेच झोपडपट्टीत राहणारे नागरिकांची सुदधा उपसमराची झळ पडत आहे.
वास्तविकता गरजुना आता खरी मदतीची गरज आहे हे इथं विशेष!तेव्हा लोकप्रतिनिधो हीच खरी कत्तल ची रात्र गृहीत धरून आरोग्यसेवेसह मदतीचे हात पुढे करावे अशी मागणी जोर धरत आहे


