Published On : Wed, Jun 26th, 2019

वडोदा गावात जलशुद्धीकरण संयंत्राचे उदघाटन

कामठी :-ग्रामस्थाना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी पालकमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अथक प्रयत्नातून कामठी तालुक्यातील वडोदा गावात उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण संयंत्राचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

या जलशुद्धीकरण संयंत्राचे उदघाटन कामठी पंचायत समिती चे सभापती अणिताताई रमेश चिकटे, भाजप तालुकाध्यक्ष रमेश चिकटे , जी प सदस्य विनोद पाटील , तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष रामकृष्ण वंजारी ,ग्रा.प. सरपंच वनिता ताई इंगोले , उपसरपंच विशाल चामट , ग्रा प सदस्य संगीताताई हिवसे ,छाया ताई बोबळे ,विद्या ताई निशाने आणि गावातील गावकरिवर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी सभापती अनिता ताई चिमटे यांच्या शुभ हस्ते लाभार्थ्यांना पाणी फिल्टरचे कार्ड वितरण करण्यात आले.

संदीप कांबळे कामठी