Published On : Wed, Jun 26th, 2019

शाळांच्या नव्या सत्राचा प्रारंभ झाला

नागपूर महानगरपालिकेद्वारा संचालित शाळांच्या नव्या सत्राचा प्रारंभ झाला. प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. न.प. पदाधिकारी, नगरसेवकांनी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्याचे स्वागत केले. विद्यार्थ्याना यावेळी पुस्तके आणि गणवेश वाटप करण्यात आले.

विवेकानंद नगर शाळेत शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, मुख्याध्यापिका रजनी वाघडे, शाळा निरीक्षक (झोन १) संजय दिघोरे यांनी विद्यार्थ्याचे स्वागत केले. संजयनगर हिंदी माध्यमिक शाळेत नगरसेवक अनिल गेंडरे, नगरसेविका सरिता कावरे, मुख्याध्यापक रवींद्र गावंडे यांच्यासह प्राथमिकचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.