Published On : Wed, Mar 6th, 2019

संविधान उद्देशिका शिलालेख कार्याचे भूमिपूजन बुधवारी

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने संविधान चौकात उभारण्यात येणा-या संविधान उद्देशिका शिलालेख कार्याचे बुधवारी (ता.६) सायंकाळी ५.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील.

संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात हे संविधान उद्देशिका शिलालेख उभारण्यात येणार आहे. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार नागो गाणार, आमदार प्रकाश गजभिये, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, पश्चीम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलींद माने, दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेता संदीप जोशी, विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे, बसपा पक्षनेते मोहम्मद जमाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनेते दुनेश्वर पेठे, शिवसेना पक्षनेते किशोर कुमेरिया, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, कमलेश चौधरी, नगरसेविका शिल्पा धोटे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख उपस्थित राहतील.

स्थायी समितीचे माजी सभापती तथा कर व कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव यांनी या कार्यासाठी पुढाकार घेतला होता. संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. आकर्षक अशा संविधान उद्देशिका शिलालेखासाठी २३ लाख रुपयांचा निधी खर्च होणार आहे.

संविधान उद्देशिका शिलालेखाची उंची सुमारे १८ ते २० फुट राहणार असून या स्मारकाचे बांधकाम पिवळ्या व लाल सॅन्डस्टोनने करण्यात येईल. यामध्ये संविधानाची प्रास्ताविका मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये पॉलीमार्बल दगडावर कोरलेली असेल. या स्मारकाची प्रतिकृती संसद भवनाप्रमाणे राहील.