Published On : Mon, Sep 23rd, 2019

मूर्तीच्या उंचीपेक्षा तुमच्या भक्तीची उंची जास्त असणे आज काळाची गरज

Advertisement

रामटेक : लोकमान्य टिळकांनी सामाजिक ऐक्यासाठी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश लक्षात घेवून आपली लोककला,परंपरा टाळ मृंदंगाच्या गजरात भजन दिंडीच्या माध्यमातून भक्तीभाव व्यक्त करावा व डि जे या प्रकारापासून दूर रहावे असे प्रतिपादन सहाय्यक पोलिस आयुक्त नयन आलूरकर यांनी यांनी केलेमोबाईल मध्येच गुंतून न राहता बाहेरील घडामोडी व चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात मुर्तीच्या उंचीपेक्षा भक्तीची उंची मोठी असली पाहिजे असेही त्या पुढे म्हणाल्या.

मसकर्या गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे गणेश विसर्जन काळात कायदा व सूव्यवस्थेचा प्रश्न पुर्व तयारी चा भाग तसेच श्री गणेश उत्सव साजरा करण्यात आला *सूंदर मूर्ती उत्कृष्ट सजावट ,शिस्तबद्ध विसर्जन या सदराखाली सार्वजनिक गणेश मंडळाना प्रमाणपत्र व शिल्ड वितरण सत्कार सोहळा कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पोलीस स्टेशन रामटेक येथे मोठया उत्साहात नुकताच सहाय्यक पोलीस अधीक्षक नयन आलूरकर पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर ,नगराध्यक्ष दिलीप देशमुख यांच्या हस्ते सम्म्पन झाला .

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आगामी काळातील सण उत्सव व होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक संबंधाने कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये या करीता रामटेक पोलीस स्टेशन ला शांतता समितीचे सदस्य तसेच पोलीस पाटील ,गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली असून सदर मीटिंग मध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक नयन आलूरकर , पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी जाणून घेतल्या .

पोलीस व जनता समन्वय सधनेच्या अनुषंगाने सर्वांशी हितगुज करण्यात आले .तसेच दिनांक 2 सप्टें ते 14 सप्टें पर्यन्त श्री गणेश उत्सव साजरा करण्यात आला त्या दरम्यान रामटेक हद्दीतील नवयुवक गणेश मंडळ रामालेश्वर वार्ड , मोठी गडपायरी गणेश उत्सव मंडळ रामटेक , युवा गणेश उत्सव मंडळ मनसर माइंस , नवयुवक गणेश उत्सव मंडळ मनसर ,श्री गणेश उत्सव मांड्री,या मंडळाची गणेश उत्सव दरम्यान सुंदर मूर्ती ,उत्क्रुष्ट सजावट तसेच शिस्तबद्ध गणेश उत्सव दरम्यान सुंदर मूर्ती ,उत्क्रुष्ट सजावट तसेच शिस्तबद्ध गणेश विसर्जन केले त्याबद्दल त्या गणेश मंडळाच्या सदस्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता .

सत्कार सोहळ्यात मंडळातील पदाधिकारी यांना सहाय्यक पोलीस अधीक्षक नयन आलूरकर ,पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांचे हस्ते महेंद्र लोधी, उमेश पटले आदीचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .ह्यावेळी नगरसेवक ,नगरसेविका , प्रटिश्टित नागरिक , गणेश मंडळ सदस्य , पत्रकार , पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे ,प्रमोद कोळेकर ,बारंगे मैडम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. गणेश मंडळाच्या सदस्यांचा त्यांनी प्रशासनाला केलेल्या सहकार्या बद्दल गौरव करण्याची ही पहेलीच वेळ असल्याचे निदर्शनास आले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता खुपीया विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी हिंगे व पोलीस स्टाफ ने प्रयत्न केले

Advertisement
Advertisement