Published On : Mon, Sep 23rd, 2019

बॉलीवुड आणि फॅशन मॉडलिंग स्पर्धा संपन्न…

नागपूर : ओरा फेस ऑफ इंडिया तर्फे नुकतेच सुरत, येथे बॉलीवुड आणि फॅशन मॉडलिंग शो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सौंदर्य स्पर्धेत संपूर्ण देशातून, वेगवेगळ्या राज्यामधून १६ मुली आणि १६ मुलांचे गट या स्पर्धेत सहभागी झाले होते. यात मुख्यतः मुंबई, दिल्ली, जम्मू , जयपूर , नागपुर, सिंगापूर, इलाहाबाद ,सुरत इत्यादी शहरांमधून मुले, मुली फॅशन, बॉलीवुड, मॉडलिंग स्पर्धे करिता आले होते.

या सौंदर्य स्पर्धेचे संयोजक दिपक अग्रवाल होते. आणि बॉलीवूड इंडस्ट्री चे सितारे मिस इंडिया वर्ल्ड २०१८ अनुक्रिती व्यास, मिस इंडिया गुजरात मानसी तक्सक, बिगबॉस फेम कवलजित सिंह, व भारत गुप्ता उपस्थित होते. यामध्ये नागपूर शहराची रेश्मा विठ्ठल कौरासे नावाची मुलगी हि चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुका, येथील मूळची असून तिची या प्रतियोगीतेत निवड करण्यात आली.

यावेळी ३२ सौंदर्यस्पर्धेे मधून अंतिम सामना झाला. त्यामध्ये फायनल मध्ये सेंकड रनर अप म्हणून निवडून आली. रेश्मा कौरासे हिने विद्युत अभियांत्रिकी मध्ये पदवी प्राप्त केली.

रेश्मा कौरासे हिला लहानपणा पासूनच मॉडेलिंग आणि अभिनया विषयी आवड होती. पालकांच्या म्हणण्या प्रमाणे तिने शैक्षणिक बाबींना महत्व देऊन शिक्षण पूर्ण केले व त्या नंतर ती आपल्या आवडीच्या विषयाकडे वळली आणि ते म्हणजे मॉडेलिंग आणि अभिनय, तीने याची सुरुवात १ ऑगस्ट २०१८ मध्ये एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेऊन केली होती. हि सौंदर्य स्पर्धा राजस्थान या राज्यातील जयपूर शहरात प्रतियोगेत सहभागी झाली होती. ज्यामधे भारतातील विविध राज्यातील २० अंतिम शो, मध्ये सहभागी होते. महाअंतिम सोहळा ५ ऑगस्ट २०१८ रोजी, रेशमाने ४ स्थानावरील पुरस्कार पटकावले. येथून तीला भरपूर अभिनयाची संधी मिळाली व तेथूनच तिच्या पंखणा भरारी मिळाली. हे विशेष