Published On : Tue, Oct 1st, 2019

अतिवृष्टीने पुन्हा घर कोसळल्याने धरमनगरचे हेडाऊ कुंटुब सकंटात

Advertisement

कन्हान : – धरमनगर पिपरी येथे पावसा च्या अतिवृष्टीने सकाळी पुन्हा हेडाऊ चे घर कोसळल्याने जिवनावश्क सामान मलब्यात दबुन भंयकर नुकसान झाल्या ने हलाखीचे जिवन जगण्यारे हेडाऊ कुंटुब भंयकर संकटात सापडल्याने शासना व्दारे आर्थिक मदत करण्याची मांगणी ग्रामस्थानी केली आहे.

मंगळवार (दि.१) ला सकाळी ७.३० वाजता दरम्यान जोरदार पावसाच्या अतिवृष्टीने नगरपरिषद कन्हान – पिपरी अंतर्गत प्रभाग क्र ३ धरमनगर पिपरी चे रहिवासी शंकर हेडाऊ यांचे कुंटुब कसे तरी हातमजुरीचे कामधंदा करून उदर निर्वाह करित होते. त्यांत एकमेव राहते घर पावसाच्या अतिवृष्टीने कोसळल्याने घरातील जिवनावश्यक वस्तु व सामान टिव्ही, कुलर, आलमारी, दिवान, वस्त्रे मलब्यात दबुन संपूर्ण उद्धवस्त झाल्याने
हेडाऊ कुंटुब भंयकर संकटात सापडुन जिवन मरणासन्न यातनेच्या मार्गावर असु न उघड्यावर जिवन व्यापनाची पाळी ओढावल्याने नगरपरिषद, तालुका व जिल्हा शासन प्रशासनावर विराजमान अधिकाऱ्यांना कळकळीची विनंती करण्यात येत की, या कुंटुबाच्या घराची पाहणी करून त्वरित शासना व्दारे आर्थिक मदतीचे यथोचित सहकार्य करावे.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अशी मागणी युवा समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार, शिवशंकर भोयर, राजु गायधने, दिलीप बारापात्रे, महादेव टांगले, विष्णु गाढवे, लखन बावणे, सोनु बारापात्रे, विजय कांबळे, वसंता हिरे, सहादेव गाढवे, अशोक मेश्राम, सुबोध चव्हान, राहुल डोंगरे, रमेश ठाकरे, दुर्गेश बर्वे, सोनाबाई केवट , कुंतीबाई हेडाऊ, पुष्पाबाई हिरे, पंचफुला बाई बरापात्रे, शोभाबाई कांबळे, चंदाबाई बावणे आदीसह पिपरी ग्रामवासी यांनी केली आहे.

Advertisement
Advertisement