Published On : Tue, Oct 1st, 2019

पेच धरणाचे १६ गेट २५ वर्षानी उघड ल्याने पेंच, कन्हान नदीला आला पुर

कन्हान : – मध्य प्रदेशातील चौराई धरण पाणलोट भागात अतिवृष्टीने तोतलाडोह व पेंच धरणाचा जलसाठा वाढत असल्याने सुरक्षेचा दुष्टीने पेंच धरणाचे तब्बल २५ वर्षानंतर १६ दरवाजे दिड मीटर उघडुन पाण्याचा विसर्ग केल्याने पेंच नदी व कन्हान नदी दुथडी भरून वाहुन पुर परिस्थिती पाहण्यास मिळाली.

मध्य प्रदेशातील चौराई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात अति वृष्टी होत असल्याने चौराई घरणाच्या सोडव्यावरून पा़ण्याचा विसर्ग केल्याने तोतलाडोह धरणाच्या येव्या मध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याने सोडण्यात येणा- या पाण्याच्या विसर्गाने पेंच धरणात पाणीसाठा ९५ % झाला होता.

Advertisement

यामुळे नागपुर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दोन वर्षा करिता सुटुन शेती करिता सिचनाचा सु़ध्दा प्रश्‍न सुटला असताना मध्य प्रदेशातील चौराई धरणाच्या पाण लोट भागात सतत अतिवृष्टी होत वाढणा -या पाणीच्या जलसाठा मुळे चौराई, तोतलाडोह धरणाच्या सुरक्षेते करिता सर्व दरवाजे उघडुन सुरक्षित जलसाठा ठेवण्याकरिता २७२७ दल़घन मीटर पाणी सोडव्या व्दारे पेंच घरणात सोडण्यात येत असल्याने १९९४ च्या पुरानंतर २५ वर्षानी शनिवार (दि.२८) दिवसा पेंच धरणाचे पुर्ण १६ दरवाजे दिड मिटर उघडुन १६४९ दलघमी पाणी धरणाच्या सुरक्षिततेच्या दुष्टीने जलाशया तुन विसर्ग पेंच नदीत सोडण्यात आल्या ने शनिवार ला पेंच व कन्हान नदी दुथडी भरून वाहत असुन सायंकाळी कन्हान नदीला १९९४ नंतर पुर परिस्थिती पाहायला मिळाली. कन्हान नदीच्या पिपरी नाल्याला पाणी उलट वाहु लागल्याने कन्हान ते गाटेघाट, जुनी कामठी चा संपर्क तुटला होता.

पेंच धरणाच्या सोडव्यातुन सोडण्या र्‍या विसर्गा मध्ये कमी जास्त प्रमाणात वाढ घट करण्यात येणार असल्याने पेंच व कन्हान नदीकाठच्या पारशिवनी, कामठी, मौदा तालुक्यातील गावातील लोकांनी आवश्यक सावधगिरी बाळगावी व शासनाकडून देण्यात येणा-या सुचनांवर लक्ष ठेवून त्याचे पालन करावे. असे आवाहन उपविभागीय अभियंता पेंच पाटबंधारे विभाग पारशिवनीचे मा. प्रणय नागदिवे, उपविभागीय अधिकारी रामटेकचे मा. जोगेंद्र कटयारे व पारशिव नीचे तहसिलदार वरूण सहारे हयानी करून परिस्थिती वर लक्ष केंद्रित करून असल्याने कुठल्याही अनुचित प्रकाराचा सामना करावा लागला नाही.

सोमवार (दि.३०) ला तोतलाडोह धरणाचे १० दरवाजे एक फुट सुरू असुन रात्री परिस्थिती पाहुन बंद करण्या त येईल तसेच पेंच धरणाचे १६ दरवाजे एक फुट सुरू असुन रात्री १२ दरवाजे बंद करून चार दरवाजे एक फुट उघडे राहतील अशी माहिती उपविभागीय अभियंता पेंच पाटबंधारे विभाग पारशिवनी चे मा. प्रणय नागदिवे हयानी दुरध्वनी वरून दिली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement