Published On : Tue, Oct 1st, 2019

अतिवृष्टीमुळे घर पडुन केवटचे कुंटुब बेघर होण्याच्या उंबरठय़ावर

कन्हान : – नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र ३ रामनगर पिपरी येथे पुन्हा पावसा च्या अतिृष्टीमुळे एक घर कोसळल्याने मासेमारी व हातमजुरी करून कसेबसे जिवन जगण्या-या पुसाराम केवट यांचे कुंटुब बेघर होण्याचा उंबरठ्यावार येऊन ठेपले आहे .

पिपरी रामनगर येथील रहिवासी पुसाराम केवट हे हातमजुरी व मासेमारी चा कामधंदा करून कुंटुबांचा कसातरी उदरनिर्वाह करत असून त्यांचे एकमेव राहण्याचे घर पाऊसाच्या अतिवृष्टीमुळे सोमवार (दि.३०) ला सकाळी ७ वाजता दरम्यान कोसळल्याने सकाळची वेळ असल्याने कुठलीही जिवहानी झाली नाही. परंतु कवेलु छत व भिंतीच्या मातीच्या मलब्यात जिवनाश्यक वस्तु अन्न ,वस्त्र, निवारा व सामान उद्धवस्त झाले.

हे कुंटुब अंत्यत हलाखीचे जिवन व्यापन करीत असल्याने साधी घराची राहण्याकरिता दुरूस्ती सुध्दा करू शकत नसल्याने त्यांचे कुंटुबाला बेघर होण्या च्या उंबरठय़ावर येऊन ठेपल्याने शासना च्या संबंधित अधिकारी यांनी केवट कुंटुबाच्या घराची व परिस्थितीची पाहणी करून अहवाल पाठवुन शासन,प्रशासना व्दारे आर्थिक सहकार्य करून मदत करण्यात यावी अशी मागणी युवा समाज सेवक प्रशांत बाजीराव मसार, शिवशंकर भोयर, संजय ठाकरे, बंडु केवट, अशोक मेश्राम, सुबोध चव्हाण, रमेश ठाकरे, दुर्गेश बर्वे, अंकुश भोयर, अनिल केवट, संजय सोनवाने, श्रीराम कोरवते, संजय भोयर, हरी उईके, प्रविण बावणे, शुभम परतेकी सह पिपरी ग्रामस्थानी केली आहे.