Published On : Wed, Feb 7th, 2018

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबई विद्यापीठाच्या निकालांचा आढावा

Advertisement

मुंबई, दि. ७ : राज्यपाल चे.विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजभवन येथे मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या निकालाचा तसेच इतर अनुषंगिक विषयांचा विस्तृत आढावा घेतला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे प्रामुख्याने उपस्थित होते.

आगामी उन्हाळी परीक्षांचे निकाल वेळेवर लागण्यासाठी करावयाच्या नियोजनाबाबत देखील यावेळी चर्चा झाली.

Gold Rate
31 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,34,100/-
Gold 22 KT ₹ 1,24,700 /-
Silver/Kg ₹ 2,38,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर.श्रीनिवास, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सह सचिव सिद्धार्थ खरात, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. विष्णू मगरे, आदी यावेळी उपस्थित होते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement