| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Feb 7th, 2018

  विश्वविजेत्या युवा क्रिकेटपटूंचा राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून सत्कार

  मुंबई : एकोणीस वर्षांखालील मुलांचा क्रिकेट विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारताच्या युवा संघाचा आज राजभवन येथे राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सत्कार करण्यात आला.

  विजयी संघाचा कॅप्टन पृथ्वी शॉ, टीममधील खेळाडू आदित्य ठाकरे आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांचा आज राजभवन येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रिडामंत्री विनोद तावडे, आमदार आशिष शेलार उपस्थित होते.

  राज्यपाल यावेळी म्हणाले, अंतिम स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन भारतीय युवा संघाने चौथ्यांदा विश्वकरंडक पटकाविला आहे. या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट संघभावनेने खेळ करताना भारतीय खेळाडूंनी दाखविलेले सातत्य कौतुकास्पद असून, भारतीय क्रिकेटसाठी ते आशादायी आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145