Published On : Tue, Feb 9th, 2021

शाळेचा पहिला दिवस- मेट्रोत विद्यार्थ्यांची गर्दी

Advertisement

– पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची पहिली पसंती ठरली माझी मेट्रो

नागपूर – लॉकडाउनच्या मोठ्या काळानंतर ११ महिन्यानंतर आज पहिल्यांदा शाळा सुरु करण्यात आल्या. क्वारंटाईनच्या काळात घरात बंदिस्त केली गेलेली लहान मुले आज शाळेच्या युनिफॉर्ममध्ये बाहेर दिसू लागली. इतका मोठा काळ घरात घालवलेली मुले अचानक बाहेर पडल्यावर त्यांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न नागपूर मेट्रोने सोडवल्याचे लक्षात आले आहे. आज फार मोठ्या संख्येने शाळेत जाणारे विद्यार्थी वेगवेगळ्या मेट्रो स्थानकांवर रांगेत उभी राहून तिकीट खरेदी करतांना आणि मेट्रोतून प्रवास करतांना नजरेस पडली.

अजूनही कोरोना संक्रमणाचा काळ संपला नसून फार गर्दीत मिसळणे किंवा असुरक्षित वाहनातून प्रवास करणे भीतीदायक आहे. हा प्रवास लहान मुलांना करावा लागणार असेल तर पालकांची चिंता वाढणे स्वाभाविक आहे. अश्यात आजपासून शाळा सुरु झाल्या आहेत. शिक्षणाचा प्रश्न असल्याने मुलांना घरात डांबून ठेवणे देखील शक्य नाही. शाळा ट्युशन आणि शिक्षणासाठी मुलांना बाहेर पडणे अनिर्वार्य असल्यामुळे अनेक पालकांना काळजी वाटू लागली आहे. शाळेत सुरक्षेची व्यवस्था आहे पण शाळेत पोचण्यापर्यंतच्या प्रवासात मुलांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न त्यांना भेडसावू लागला.

अश्यात स्वच्छ सुरक्षित आणि सुलभ प्रवास असणाऱ्या नागपूर मेट्रोचा प्रवास जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांसाठी निवडला आहे. आज शाळेत जाण्यासाठी आणि शाळेतून घरी परत जाण्यासाठी अनेक शाळकरी मुलांनी स्थानकावर एकच गर्दी केली. शाळकरी मुलांची गर्दी असली तरी या मुलांनी शिस्तबद्ध रीतीने स्थानकावरील सर्व नियमांचे पालन करत, रांगेत उभे राहून तिकीट खरेदी करून मेट्रोने सुरक्षित प्रवास केला. वेगवेगळ्या मेट्रो स्थानकावर आणि मेट्रोमध्ये शाळेच्या युनिफॉर्ममधलय या मुलांना पाहून इतर प्रवाशी देखील आनंदले.

नागपूर मेट्रोच्या एक्वा मार्गिकेवर अनेक शाळा-महाविद्यालय आहेत. हिंगणा मार्गावरून येणारे अनेक विद्यार्थी या शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण घेत आहे. या पूर्वी स्वतःच्या सायकल किंवा वाहनाने किंवा इतर असुरक्षित माध्यमातून शाळेत पोचणाऱ्या विचार्थ्यांना कमी खर्चात कमी वेळेत शाळेत किंवा घरी पोचवणारा मेट्रो अधिक सुविधाजनक वाटू लागली आहे.