Published On : Tue, May 21st, 2019

मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Advertisement

नागपूर: लोकसभेच्या रामटेक व नागपूर मतदारसंघातील मतमोजणी गुरुवार दिनांक 23 मे रोजी कळमना मार्केट यार्ड परिसरात करण्यात येणार असून, प्रत्यक्ष मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला.

कळमना मार्केट परिसरातील दोन मोठ्या दालनामध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार असून, रामटेक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार असून, यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय 20 टेबल लावण्यात आले असून, यावर सकाळी 8 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होईल. तत्पूर्वी याच परिसरात विशेष तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉगरुममधून सकाळी 6 वाजता राजकीय पक्ष तथा उमेदवारांच्या उपस्थितीत स्टाँगरुम उघडण्यात येईल.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मतमोजणीच्या परिसरालासुद्धा तीनस्तरीय विशेष सुरक्षा राहणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अधिकृत पास असलेल्या व्यक्तींनाच या परिसरात प्रवेश देण्यात येणार आहे.

मतमोजणी केंद्रामध्ये कुणालाही मोबाईल नेण्यास निर्बंध असल्यामुळे सर्व मतमोजणीसंबंधी अधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय पक्षांच्या नियुक्त केलेल्या प्रतिनिधींनी या परिसरात येताना मोबाईल सोबत आणू नयेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.

पत्रकारांसाठी माध्यम केंद्र सुरु करण्यात आले असून, या केंद्रामध्ये संगणक तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मतमोजणीची सुरुवात पोस्टल बॅलेट पेपरने होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रांच्या मतमोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक फेरीनिहाय मतमोजणी होणार असून त्याप्रमाणे निकाल जाहीर करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली आहे. यावेळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे, उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे, जिल्हा पुरवठा अधिकारी लिलाधर वार्डेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी तायडे तसेच विविध विभागांचे नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement