Published On : Mon, Oct 28th, 2019

कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळीच्या आनंदावर विरजन

Advertisement

कामठी :-कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांचे हातात पीक येण्याच्या तोंडावर पावसामुळे बळीराजा हा आर्थिक विवंचनेत अडकला असून आनंदाचा व उत्साहाचा मानला जाणारा दिवाळी पर्व च्या आनंदावर कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांवर विरजण पाडले आहे.

कामठी तालुक्यातील शेतकरीवर्ग, शेतमजूर, कामगार, मजुरवर्ग यांच्यामध्ये दिवाळीच्या पर्वावर जो आनंद असायला पाहिजे ते कुणाच्याही चेहऱ्यावर फुलताना दिसत नाही सर्वत्र निराशाजनक वातावरण असून दिवाळीच्या या महत्वाच्या सणावर निसर्गाची अवकृपा व शासनाची नाकर्ते भूमिका असल्यामुळे सर्वत्र विरजण आल्यासारखी परिस्थिती ग्रामीण भागातील शेतकऱ्यात निर्माण झाली आहे.

Gold Rate
26 July 2025
Gold 24 KT 98,300 /-
Gold 22 KT 91,400 /-
Silver/Kg 1,13,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वास्तविकता ऐन पिके हाती येण्याच्या तोंडावर पावसाच्या भडिमाराणे मुख्य पिकांचे चांगलेच नुकसान झाल्याने शेतकऱ्यांत आर्थिक कोंडी पसरली त्यात शेतकऱ्यांचा सोयाबीनचा मोठा फेरा असलेला पीकाचे पूर्णतः नुकसान झाले., सोयाबीन पीक हातातून गेले असताना तूर, हरभरा, परहाटी, गहू या पिकावर उत्पन्नाचा कुठलाही भरवसा राहला नाही.

वास्तविकता सोयाबिन पीक हा दिवाळी सण साजरा करण्याकरता आशेचा किरण असतो मात्र ऐनवेळी पाऊस अधिकच पडत असल्याने ग्रामीण भागातील सोयाबीन व धान पीकाचे नुकसान झाले आहे. .तसेच काही भागात फारच कमी प्रमाणात उत्पादन मिळाले अश्या स्थितीत शेतकऱ्यांनि दिवाळी तरी कशी साजरी करावी?असा प्रश्न पडला आहे.इतकेच नव्हे तर काही शेतकऱ्यांनि रब्बी पिकासाठी तसेच उदारनिवाहासाठी घरातील सोने गहाण ठेवण्याचा सपाटा सुरू झाला आहे.

बॉक्स :- कामठी तालुक्यातील शेतपिकांचे पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त निधीतून अनुदान देत आर्थिक आधार द्यावा अशी मागणी युवक कांग्रेस चे पदाधिकारी अनुराग भोयर, इर्शाद शेख, अतुल बाळबुधे,अमोल खोडके, विजय खोडके, निखिल फलके, किशोर धांडे, धर्मराज आदमणे , आदीच्या नेतृत्वात तहसीलदार कडे मागणी करण्यात आली आहे.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement