Published On : Mon, Oct 28th, 2019

धावत्या रेल्वेगाडीच्या धडकेने वृद्ध महिला जख्मि

कामठी :-स्थानिक रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या होम सिग्नल कामठी रेल्वे मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या धावत्या रेल्वेगाडीच्या धडकेने घडलेल्या अपघातात 62 वर्षीय वृद्ध महिला जख्मि झाल्याची माहिती नुकतीच रेल्वे पोलीस गोरखनाथ पांडे यांना मिळताच पोलिसानी वेळीच घटनास्थळ गाठून घटनास्थळचा पंचनामा करीत जख्मि महिलेला ताब्यात घेत पुढील उपचारार्थ नागपूर येथील मेयो इस्पितळात वॉर्ड क्र 39 मध्ये हलविण्यात आले.

असून उपचार सुरू आहे.जख्मि महिलेचे नाव सुदूबाई सवाणे वय 62 वर्षे रा फिरस्ता असे सांगत असले तरी जख्मि महिलेच्या खऱ्या निवासी पत्ताची ओळख पटलेली नाही.

जख्मि वृद्ध महिलाची उंची 5 फूट असून चेहऱ्याचा रंग सावळा, केस काळे पांढरे,बांधा मजबूत, निळ्या व पिवळे ठिपके असलेल्या रंगाची साडी, हिरव्या रंगाचे ब्लाउज परिधान केले असून हातात पिवळ्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घातलेल्या आहेत तेव्हा या जख्मि महिलेच्या संबंधित नातेवाईकांनी रेल्वे पोलीसांशी संपर्क साधण्यचे आव्हान रेल्वे पोलिस गोरखनाथ पांडे यांनी केले आहे


संदीप कांबळे कामठी