Published On : Mon, Oct 28th, 2019

कामठी तालुक्यात दिवाळी पर्व हर्षोल्लाहसात साजरा.

पावसामुळे दिवाळीच्या आनंदावर पडले विरजण

कामठी :-दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कामठी तालुक्यात दिवाळी पर्व मोठ्या हर्षोल्लाहसाने साजरे करण्यात आले मात्र फटाके फोडतेवेळीच रात्री 8 वाजेदरम्यान झालेल्या परतीच्या पावसाने आनंदावर विरजण पडले.दिवाळी निमित्ताने काल 27 नोव्हेंबर ला सकाळपासूनच नागरिकांमध्ये उत्सुकता होती .तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागतोल गृहिणींनी सकाळपासूनच आपापल्या अंगणाची स्वच्छता तसेच रांगोळी काढताना दिसून आल्या तर शहरातील मुख्य बाजारपेठ गुजरी बाजार , गोयल टॉकीज रोड परिसर तसेच गांधी चौकासह आदी ठिकाणी आम्रपान, केळीची पाने, गेंदफुल खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी दिसून आली तसेच दिवणालीपेक्षा पणत्यांच्या दुकानात खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली त्याचप्रमाणे येथे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कपडे , दागिने आदींची मोठ्या प्रमाणात खरेदी केली तसेच दिवाळीचा दिवस असल्याने सायंकाळी 8 वाजेसुमारास घरोघरी श्री महालक्ष्मीच्या पूजा अर्चानेची सुरुवात केल्यानंतर आतिषबाजी तसेच फटाक्यांचा आवाज सुरू झाला मात्र वाढत्या महागाईमुळे यावर्षी दिवाळीला फटाक्यांची आतिषबाजी ही फक्त नामधारीच ठरली …. तर लक्ष्मी पूजन करतेवेळी अकस्मात झालेल्या पावसामुळे आनंदावर विरजण पडले.

संदीप कांबळे कामठी