Published On : Tue, Apr 3rd, 2018

मर्चंट नेव्हीतील संधींविषयी देशभर प्रदर्शनाचे आयोजन व्हावे – मुख्य सचिव

मुंबई : मर्चंट नेव्हीमध्ये उपलब्ध असलेल्या संधींविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरात प्रदर्शनांचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहन मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आज येथे केले. राष्ट्रीय मेरीटाईम दिनानिमित्त मंत्रालयात जहाज बांधणी विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्य सचिव म्हणाले, मर्चंट नेव्हीमध्ये जास्तीत जास्त नोकरीच्या संधी निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने कौशल्य शिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल. मर्चंट नेव्हीविषयी जनजागृती होणे आवश्यक असून जहाज बांधणी विभागाने ठिकठिकाणी अशा प्रदर्शनांचे आयोजन करणे गरजेचे आहे.

Advertisement

प्रदर्शनातील वेगवेगळ्या स्टॉलला मुख्य सचिवांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. याशिवाय येथील छायाचित्र प्रदर्शनाची प्रशंसा केली.

५ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय मेरिटाईम दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून जहाज बांधणी विभाग महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली मेरिटाईम प्रदर्शन समितीमार्फत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून उद्यापर्यंत ते सुरु राहणार आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement