Published On : Tue, Apr 3rd, 2018

यवतमाळ जिल्ह्यातील निवासी अतिक्रमणांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आढावा

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील देवनगर (ता. दिग्रस) व अशोकनगर (ता. नेर) येथील निवासी अतिक्रमणांबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला.

मंत्रालयात झालेल्या या बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री संजय राठोड, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, वन विभागाचे सचिव विकास खारगे, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

Advertisement

देवनगर आणि अशोकनगर येथे १ हजार ६५ इतकी निवासी अतिक्रमणे आहेत. ही निवासी अतिक्रमणे नियमित करण्यात यावीत, अशी स्थानिकांची मागणी आहे. त्या अनुषंगाने आजच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement