Published On : Tue, Apr 3rd, 2018

फोन खणखणताच त्या माऊलीचा श्वास गुदमरला!

Advertisement


नागपूर: आरपीएफ कडून फोन खणखणताच त्या माऊलीचा श्वास थोड्यावेळासाठी थांबल्यासारखाच झाला. कारण एक वर्षा पूर्वी त्यांच्या पतीच्या निधनाची बातमी आरपीएफ कडूनच फोनव्दारे मिळाली होती. मात्र, पुढील शब्द कानी पडले आणि क्षणाचाही विलंब न करता त्या रेल्वे स्थानकावर पोहोचल्या. मुलाला सुखरुप पाहून त्या ढसाढसा रडल्या. कारण वेळ आणि गाडीही तीच होती. त्यांचे पतीही मुलाला सोडायला रेल्वे स्थानकावर गेले होते. त्यानंतर ते घरी परतलेच नाही. अचानक हॉर्ट अटॅक येवून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची सूचना आरपीएफकडूनच त्या माऊलीला मिळाली होती. आता पुन्हा आरपीएफकडून फोन आल्याने त्यांच्या श्वास गुदमरल्यासारखा झाला. डोळ्यात आसावांची गर्दी आणि चेहºयावर भीतीचे सावट… अशा स्थितीत त्या आरपीएफ ठाण्यात पोहोचल्या. मुलाला सुखरुप पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रृ तरळले. त्यांनी लगेच मुलाला कवटाळून ढसाढसा रडल्या.

रेल्वे स्थानकावर पाय ठेवताच काही वेगळाच भास होतो. आपण वेगळ्यात विश्वासत आल्यासारखे वाटते. खाद्य पदार्थ विक्रेत्यांची ओरड… रेल्वे प्रशासनाकडून होणारी अनाऊंमेंट आणि प्रवाशांची गर्दी. हे दृष्य पाहून पालकही मुलांचे बोट धरुन ठेवतात. तरीही प्रवाशांचा लोंढा वाढला की नातेवाईकांची ताटातूट होते. अशा चांगल्या वाईट अनेक घटना रेल्वे स्थानकावर घडतात. असाच काहीसा प्रकार नागपूर रेल्वे स्थानकावर घडला. कामठीतील रहिवाशी राजेश (काल्पनिक नाव) असे त्याचे नाव आहे. तो १४ वर्षांचा आहे. संध्या तो आठव्या वर्गात असून भारतीय विद्या भवन, तोडपल्ली (आंध्रप्रदेश) येथे शिक्षण घेत आहे. सुट्यात तो घरी आला निकाल असल्याने त्याला १२७२२ दक्षिण एक्स्प्रेसने आध्रप्रदेशला जायचे होते. त्यानुसार तो सायंकाळी १८.३० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर आला. याच वेळी ११०३९ कोल्हापूर – गोंदिया महाराष्टÑ एक्स्प्रेस फलाट क्रमांक ६ वर आली. दक्षिण समजून तो महाराष्टÑ एक्स्प्रेसमध्ये बसला. गाडी पुढील प्रवासाला निघाली.

दरम्यान आपण चुकीच्या गाडीत बसल्याचे त्याला टीसी कडून समजले. अल्पवयीन मुलगा असल्याने टीसीने रेल्वे कंट्रोलला फोन व्दारे सूचना दिली. आरपीएफ चे एएसआय मुगशुद्दीनला माहिती मिळताच त्यांनी १८.४५ वाजता कामठीत पोहोचलेल्या महाराष्टÑ एक्स्प्रेसमध्ये राजेशचा शोध घेतला. त्याला उतरविले तसेच राजेशच्या आईला फोन केला. आरपीएफ ठाण्यातून बोलतो… हे शब्द राजेशच्या आईच्या कानी पडताच. त्यांना त्यांच्या पतीची आठवण होऊन त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. कठोर मनाने त्यांनी पुढचे शब्द ऐकले. पण ते सुखावनारे होते. धावपळ करत त्या कामठी रेल्वे स्थानकावर पोहोचल्या. मुलाला सुखरुप पाहून हृदयाशी कवटाळले आणि ढसाढसा रडल्या. काही वेळासाठी आरपीएफ ठाण्यातील वातावरणही भावूक झाले होते.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement