Published On : Fri, Aug 23rd, 2019

कामठी तालुक्यात ठिकठिकाणी झाल्या कान्होब्याच्या प्रतीष्ठापणा

भारतोय संस्कृतीत श्रीकृष्ण जन्माष्टमी महत्वाचा सण

कामठी :-भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीत 28 व्या युगात देवकीपुत्र भगवान श्रीकृष्ण जन्मले होते असे ब्रह्मपुराणात सांगितले आहे तेव्हापासूनच दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण भारतीय संस्कृतीत महत्वाचा सण म्हणून गणल्या जातो यावर्षी सुद्धा श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या निमित्ताने कामठी तालुक्यात ठिकठिकाणी कानोब्याची प्रतिष्ठपणा करण्यात आली असून 24 ऑगस्ट ला भगवान श्रीकृष्ण मूर्तीचे विसर्जन होणार आहे.

श्रीकृष्णाचा जन्म गोकुळात मध्यरात्री मुसळधार पाऊस , विजांचा कडकडाट,यमुना नदी दुघडी भरून वाहत असताना झाला.सर्व मार्ग बंदिस्त असताना श्रीकृष्ण जन्म घेतो व अत्याचाराचा अंत करतो यामध्ये कांसवध, जरासंध, व शिशुपालाचा नाश करणारा तसेच द्रौपदीची विटंबना होत असताना राक्षणासाठी धावून येणारा किंवा प्रेमाने अर्जुनाचे घोडे हाकणारा श्रीकृष्ण वेगळाच दिसतो .

यावर्षी दरवर्षी प्रमाणे बाजारपेठेत श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या पर्वावर भगवान श्रीकृष्ण च्या मुर्त्या विक्रेत्यांनी विविध रंगाच्या छटा देऊन विक्रीला आणलेल्या होत्या .तर भाविक भक्तांकडुन श्रीकृष्ण मूर्तीची खरेदी करताना बाजारपेठेत गर्दी उसळली होतो.तर आज प्रतिष्ठापन केलेल्या श्रीकृष्ण मूर्त्यांची उद्या 24 ऑगस्ट ला विसर्जन होणार आहे.

संदीप कंबळे कामठी