Published On : Fri, Mar 30th, 2018

जनशक्ती विरोधात धनशक्ती अशीच निवडणूका होणार – मुकुल वासनिक

Advertisement


नागपूर: भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्वच आघाड्याांवर अपयशी ठरले असून समाजातील प्रत्येक घटक आज नाराज आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूका जनशक्ती विरोधात धनशक्ती अशाच होणार आहेेत अन् त्या साठी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांने तयार असावे असे आवाहन अ.भा.काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांनी येथे केले.

नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या गणेशपेठ येथील कार्यालयात आयोजित प्रमुख काँग्रेस कार्यकत्र्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला जिल्ह्याातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

अ.भा.काँग्रेस कमिटीचे अधिवेषन दिल्ली येथे पार पडल्यानंतर आज जिल्ह्याातील प्रमुख कार्यकत्र्याची ही पहिलीच बैठक होती. यावेळी कार्यकत्र्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. सर्वप्रथम अ.भा.काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षासाठी जे योगदान दिले त्या बद्दल त्यांचा आणि नव्यानेच अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारल्या बद्दल राहुलजी गांधी यांचा अभिनंदन ठराव या बैठकीत पारीत करण्यात आला.

दिल्ली येथे पार पडलेल्या अ.भा. अधिवेषनात ज्या ज्या विषयांवर चर्चा झाली त्यात कृषी, रोजगार, सिंचन, आर्थिक व्यवस्था, सामाजिक न्याय, उद्योग आदि विषयांचा प्रामुख्याने समावेष होता. या विषयांवर काँग्रेसची भूमिका काय राहणार या बाबत वासनिक यांनी बैठकीत सविस्तर मार्गदर्षन केले येणाÚया ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधानसभा व लोकसभा निवडणूकांबाबत बैठकीत सविस्तार चर्चा करण्यात आली. पक्षाच्या संघटन बांधणीबाबत, यावेळी अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या पक्षाला अधिक मजबूत करण्यासठी नव्याने जिल्हा आणि तालुका कार्यकारिणी तयार करण्यात यावी अषी सुचनाही यावेळी करण्यात आली, संपूर्ण जिल्ह्याात बुथ पातळीवर टिम तयार करण्याचा आणि जिल्ह्याात असलेल्या 2300 बुथवर प्रत्येकी 12 कार्यकर्ते नेमण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

या बैठकीच्या अध्यक्षपदावरुन बोलताना राजेंद्र मुळक यांनी भाजप शासनावर जोरदार टीका केली. समाजातील प्रत्येक घटकात आज असंतोष आहे. शेतकरी, व्यापारी पेटून उठला आहे. दुर्बल घटकांना सामाजिक न्याय देऊ शकणाऱ्या जिल्हा परिशदेच्या योजना ठप्प आहेत. शेतकरी आणि गरीबांना न्याय नाकारला जात आहे. सत्ता परिवर्तन आता अटळ असून काँग्रेस कार्यकत्र्यांने जिद्दीने कामाला लागावे असे आव्हाहनही राजेेंद्र मुळक यांनी केले. जिल्हा आणि तालुका पातळीवर एक दिवसांचे शिबीर यापूढे होईल आणि त्यात देष व राज्य पातळीवरील नेते मार्गदर्षन करती असेही मुळक यांनी स्पष्ट केले. या बैठकीला प्रामुख्याने माजी आमदार एस.क्यु. जामा, रविद्र दरेकर, नाना गावंडे, तक्षषिला वाघधरे अध्यक्षा ना.जि.ग्रा.काँग्रेस कमिटी., सुरेष भोयर, बाबुराव तिडके, रमेष जोध, कुंदा राऊत, मुजीब पठाण, सुनिता गावंडे, दिपक काटोले, चंद्रपाल चैकसे, सुरेष कुमरे, वसंतराव गाडगे, हर्षवर्धन निकोसे, असलम शेख, गज्जु यादव, दयाराम भोयर, पि.टी. रघुवंषी, सचिन किरपान, शांताताई कुमरे, नाना कभांले, कंुदाताई आमधरे, अरुन हटवार, मनोज तितरमारे, बबिताताई साठवणे, सुनिल जामगडे, दिलीप सिरसाम, ज्ञानेष्वर वानखेडे, कृष्णा यादव, सतिष लेकुरवाळे, सुदर्षन नवघरे, बारोकर गुरुजी, बाबा आष्टणकर, संजय जगताप, राजा तिडके, अषोक पुनवटकर, प्रकाष ताटे, सतिष चव्हाण, सुधाकर खानोरकर, गंगाधर रेवतकर, चंद्रषेखर ठवकर, मोहन मते, बषीर पटेल, आबिद ताजी, शकुर नागाणी, चेतन देषमुख, महेष मडावी, अवंतिका लेकरवाळे, ज्योती झोड, प्रकाष वसू, विलास कडू, अमजद पठाण, राजेष देषमुख, श्रीराम काळे, बबिता रंगारी, ज्योत्स्ना मंडपे, पवन जैस्वाल, इरषाद शेख, श्याम धकाते, सचिन भोयर, शषीकंात थोटे, जितू गिरडकर, शफी शेटे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. आभार प्रदर्षन तक्षषिला वाघधरे यांनी केले.