Published On : Sun, Sep 15th, 2019

आर्थिक मंदीमुळे कंत्राटी कामगारांच्या नोक-यांवर गंडात्तर-चक्रवर्ती

Advertisement

नागपूर: मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशात मंदी असून नागपुरातील महिंद्रा आणि भंडारा येथील अशोक लेलॅंड कंपनीचे उत्पादन कमी झाले आहे. त्याचा परिणाम कंत्राट कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले तर नियमित कर्मचाºयांचे वेजेस कमी करण्यात आले, असे प्रतिपादन अखिल भारतीय विमा पेंशनर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सरचिटणीस टी.के. चक्रवर्ती यांनी केले.

भारतीय आयुर्विमा महामंडळातील गट क आणि गट ड कर्मचाºयांची सर्वांत मोठी व प्रमुख संघटना नागपूर विभागीय आयुर्विमा कर्मचारी युनियनचे ५९ वे वार्षिक संमेलन सहकार जीवन सभागृहात शनिवारी आयोजित करण्यात आले होते. संमेलनाचे उद््घाटक म्हणून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून
ज्येष्ठ विमा कामगार नेते रमेश पाटणे व स्वागताध्यक्ष संघटनेचे सरचिटणीस अनिल ढोकपांडे तर अध्यक्षपदी संघटनेचे अध्यक्ष पी.व्ही. मिलिंदकुमार मंचावर उपस्थित होते.

Gold Rate
17 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,42,600/-
Gold 22 KT ₹ 1,32,600 /-
Silver/Kg ₹ 2,83,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

चक्रवर्ती म्हणाले, गेल्या पाच वर्षांत देशात असे चित्र निर्माण केले जात आहे, जसे भारत जगात सर्वांत शक्तीशाली आहे. सर्वांत प्रगतीशिल आहे आणि त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. परंतु वास्तविकता वेगळी आहे. देशात जीडीपीचे सूत्र बदण्यात आले. जी.डीपी वाढवून सांगण्यात येत आहे. आर्थिक मंदीमुळे लोकांचे क्रयशक्ती कमी झाली आहे. शेतकºयांची हालत खराब आहे. मोदी केवळ नोट आणि वोटबॅंकेचे राजकारण करीत आहे. त्यासाठी मतदानासाठी राष्ट्रवाद आणि पैशाची त्यांच्या उद्योजक मित्रांना फायदा दिला जातो आहे, असेही ते म्हणाले. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे इतर सार्वजनिक क्षेत्राप्रमाणे एलआयसीवर धोका संभावतो आहे. त्यासाठी प्रत्येक कर्मचारी आपली नोकरी आणि संघटनेशी कटिबद्धता वाढवणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
मोदी सरकारने एलआयसी कर्मचारी नियुक्त करताना विशिष्ट काळापर्यंत सेवेत राहण्याची अट घातली आहे. आता त्याची पुढील पावले एलआयसीला शेअर मार्केटच्या यादीत समाविष्ट करण्याचे आहे. परंतु आम्ही ते होऊ देणार नाही. येत्या ३० सप्टेंबर सर्व संघटनांची बैठक नई दिल्ली येथे होेत आहे. त्यात सरकारच्या धोरणाविरूध्द आंदोलनाचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे ज्येष्ठ विमा कामगार नेते रमेश पाटणे म्हणाले.

यावेळी स्वागताध्यक्ष संघटनेचे सरचिटणीस अनिल ढोकपांडे तर अध्यक्षपदी संघटनेचे अध्यक्ष पी.व्ही. मिलिंदकुमार यांचेही मार्गदर्शन झाले.

संमेलनात संघटनेच्या उपाध्यक्षा नेहा मोटे, सहसचिव नरेश अडचुले व वाय. आर. राव,यांनी संबोधित केले. संमेलनात नवीन कार्यकारिणी निवड, वार्षिक जमा खर्चाला मंजूरी, सुधारित वेतनश्रेणी, नोकरभरती, शासन-प्रशासनाच्या कामगारविरोधी धोरणाविरोधी संघर्ष, महागाई,कामगार कपात,टाळेबंदी इ.विषयावर चर्चा झाली. तसेच सेवानिवृत्त झालेल्या १९ कर्मचा-यांचा शाल,श्रीफळ व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला.

संमेलन यशस्वी करण्यासाठी जी.हरी शर्मा,राजेश विश्वकर्मा, अभय पाटणे, निर्मला नायडू, शिवा निमजे, हिना जिभकाटे, संदीप लातुरकर, एम.डी, पवनीकर, राजकुमार, फुलबांधे, अभय पांडे, संजय लांजेवार, राजेश खंडेलवाल,एस.एस. शंभरकर,मनोज आजनकर,यांनी सहकार्य दिले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement