Published On : Sun, Sep 15th, 2019

धर्मराज मध्ये चिमुकल्यांनी साकारले मातीकलेतून गणपती

कन्हान : – येथील धर्मराज प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मातीकलेतून अप्रतिम अशा गणेश मूर्ती साकारल्या. कलेला हौस नसते असे म्हणतात, अशीच काहीशी प्रचिती आणून देत वर्ग तिसरीच्या २० विद्यार्थ्यां नी वर्गशिक्षक व मार्गदर्शक श्री अमीत मेंघरे सरांच्या मार्गदर्शनाखाली विविध आकारात व रुपात श्री गणरायाची मूर्ती साकारत आम्ही सुद्धा कलेचे उपासक असल्याचे सिद्ध केले आहे.

आज झालेल्या छोटेखानी प्रदर्शनीत सर्व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना हि कला दाखविण्यात आली. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सर्व मूर्तींचे मुख्याध्यापिका आशा हटवार व श्री दिनेश ढगे सरांनी विधिवत पूजन केले. यावेळी पालक सदस्य श्री मधुमटके, चंद्रशेखर मोटघरे, सौ परीणिता अनकर उपस्थित होते.

या मातीकलेत प्रथम क्रमांक लावण्य गि-हे, द्वितीय क्रमांक जानवी अंबिलडुके तर तृतीय क्रमांक मानवी सोमकुवर या विद्यार्थ्यांचा आला. या मातीकलेत लावण्या गीऱ्हे, जानवी अंबिलडुके, मानवी सोमकुवर, जन्नत हटवार, सिमरन हिंगे, सिद्धेश पारधी, वैदेही बडवाईक, वैदेही महल्ले, उन्नती बडवाईक, पूजा चकोले, गुंजन कुरटकर, ऋतुजा भुते, मान्यता मोटघरे, धनश्री ठाकरे, भावना गाथे, श्रावली अवझे, साक्षी सायरे, श्रवणी बोन्द्रे, युवराज वानखेडे, मंथन मस्के यांनी सहभाग घेतला होता.

मातीकलेविषयी श्री खिमेश बढिये यांनी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांनी मातीकला आत्मसात करून अधिकाधिक नवनवीन वस्तू बनविण्याचे प्रयत्न करावे असे सांगितले तसेच या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी उपक्रमशिल शिक्षक श्री मेंघरे यांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी चित्रलेखा धानफोले, भिमराव शिंदेमेश्राम, राजु भस्मे, किशोर जिभकाटे, प्रिती सेंगर, हर्षकला चौधरी, शारदा समरित, अपर्णा बावनकुळे, पूजा धांडे उपस्थित होते.