Advertisement
कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गवलीपुरा वाल्मिकी नगर येथे एका तरुणाने दारूच्या नशेत जख्मि तरुणाच्या आईशी शाब्दिक वाद घातल्या नंतर मोबाईल वर मॅच पाहत असलेल्या मुलाच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार करून जख्मि केल्याची घटना काल रात्री साडे अकरा दरम्यान घडली असून यासंदर्भात जख्मि तरुण फिर्यादी हर्ष सुनील उज्जेनवार वय 20 वर्षे रा गवळीपूरा कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी राहुल उर्फ रवी उज्जेनवार वय 30 वर्षे रा गवळीपूरा ।वाल्मिकी नगर कामठी विरुद्ध भादवी कलम 324 अनव्ये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.
संदीप कांबळे कामठी