Published On : Sat, Aug 17th, 2019

नादुरुस्त ट्रक दुरूस्त करतांना मागुन ट्रकच्या धडकेत ट्रक चालकाचा मुत्यु

कन्हान : – नागपुर जबलपूर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील खंडाळा (घटाटे) शिवारात नादुरूस्त १० चाकी ट्रक दुरुस्ती करित असताना मागुन १२ चाकी ट्रकच्या धडकेत १० चाकी ट्रक चालकाचा घटनास्थळीच मुत्यु झाला.

शुक्रवार (दि.१६) ला रात्री १२.४० वाजता वाडी नागपुर येथुन माल भरून बनारस ला जाणाऱ्या १० चाकी ट्रक क्र एम पी २० एच बी १९१० नागपुर जबलपूर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरी ल तारसा रोड उडाण पुला सामोर खंडाळा (घटाटे) शिवारात ट्रकचे टाईट व ट्रक अचानक बंद झाल्याने ट्रक बाजुला उभा करून खाली उतरून चालक डॉयनोमा दुरूस्त करित असता ना नागपुर कडुन येणा-या १२ चाकी ट्रक क्र एच आर ७३ ए ८६४५ च्या चालकांनी आपले वाहन निष्काळजीपणे चालवुन नादुरुस्त १० चाकी ट्रक ला जोरदार धडक मारल्याने ट्रक सामोर ढकल्याने स्व:तच्या ट्रकच्या चाकात चेंदामेंदा होऊन ट्रक चालक संकटमोचन तिवारी वय ४२ वर्ष रा मोऊगंज जि. रिवा मध्य प्रदेश याचा घटनास्थळीच मुत्यु झाला.

Gold Rate
11 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,300 /-
Gold 22 KT ₹ 1,01,600 /-
Silver/Kg ₹ 1,25,200/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

१२ चाकी वाहनाने भर वेगात जोरदार धडक मारल्याने ट्रक पलटुन ट्रक चालक अजरूद्दीन सुध्दा किरकोळ जखमी झाला आहे. कन्हान स्टेशन चे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पवार पोलीस कर्मचा-यासह घटनास्थळी पोहचुन ट्रक चालकाचा मुत्युदेह शवविच्छेदन करिता उपजिल्हा रूग्णालय कामठी ला रवाना करून पुढील तपास करीत आहे.

Advertisement
Advertisement