Published On : Sat, Aug 17th, 2019

उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची कामठीच्या ड्रॅगन पॅलेस टेंपलला सदिच्छा भेट

नागपूर: राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या 17 व्या अ.भा. संमेलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या उच्च न्यायलयातील न्यायमूर्तींनी कामठीच्या ड्रॅगन पॅलेस टेम्पलला सदिच्छा भेट दिली. आज आणि उद्या हे संमेलन नागपुरात होत आहे.

शुक्रवारी दुपारी 4 वाजता जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे न्या. राजेश बिंडाल, उत्तराखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती लोकपाल सिंग, राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीमती शबाना, जयपूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महम्मद रफीक यांनी कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेंपलला सदिच्छा भेट दिली.

याप्रसंगी डॅ्रगन पॅलेस टेंपलच्या प्रमुख आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या सर्वांनी भगवान गौतम बुध्दाच्या मूर्तीसमोर वंदन केले. तसेच सामूहिक बुध्दवंदनेत सहभागी झाले. अ‍ॅड. कुंभारे यांनी ड्रॅगन पॅलेसच्या निर्मितीपासून आजपर्यंतच्या विकासाची सर्व माहिती त्यांना दिली. तसेच येथे चालणार्‍या सामाजिक, शैक्षिणक, धार्मिक उपक्रमांची माहिती दिली.
याप्रसंगी ड्रॅगन पॅलेस टेंपल हे शांती आणि मैत्रीचे प्रतीक म्हणून प्रेरणा देत राहील असे उद्गार न्या. राजेश बिडाल यांनी काढले.